मिरा-भाईंदर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या गेली ८२० वर

मिरा-भाईंदर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या गेली ८२० वर


 


देशात आणि राज्यात जसा कोरोनाचा कहर माजलेला आहे त्याच धर्तीवर मिरा-भाईंदर शहरात कोरोना ग्रस्त रुग वाढण्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच आहे. सरकारने केलेले नियोजन कोरोनाला आतापर्यंत थांबवू शकले नाही. उलट कोरोना विषाणूने आपले जाळे अधिक पसरावयाला सुरवात केली आहे. शहरात मागील १५ दिवसात रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे आता शहरातिल नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. सरकारने जरी न घाबरण्याचे आवहान केले असले तरी दररोज मिळून येत असलेल्या रुग्णामुळे चिंता अधिक  वाढत चालली आहे आज शहरात कोरोनाची लागण झालेले ४३ रुग्ण मिळून आले तर ८ जनांचा मृत्यू झाला आहे.आणि २२ जण कोरोना मुक्त झाले आहेत..


 


मुंबई लगत असलेले शहर म्हणून ओळखले जाणारे मिरा-भाईंदर शहरात ही कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. मुंबई जसे काही  विभागात  रुग्ण अधिक प्रमाणात मिळून येत आहेत तशीच परिस्थिती मिरा-भाईंदर शहराची आहे. मिरा-भाईंदर मधिल काही विभागात नविन रुग्ण मिळण्याचे  प्रमाण अधिक प्रमाणात आहे. शहरात लॉकडाउन चांगल्या पद्धतीने पाळला गेला तरीही रुग्ण कमी होताना दिसत नाहीत या कोरोना विषाणूचा संक्रमण होण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांमध्ये जागरूकता  निर्माण झालेली असतांना ही योग्यप्रकारे काळजी घेतली जात नाही त्यामुळे हा आकडा वाढत चालला आहे असे सुज्ञ नागरिक आणि जाणकारांना वाटते आहे. म्हणून प्रत्यकाने काळजीपूर्वक वागणे गरजेचे आहे तरच हा वाढत असलेला धोका आपण टाळू शकतो.


मिरा- भाईंदर शहरात आतापर्यंत ३१५० नागरिकांची कोरोनाच्या संदर्भात चाचणी केली गेली त्यापैकी ८२० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल आले आहेत तर आतापर्यंत २०८५ जण निगेटिव्ह आले आहेत तर २४५  जनांचे अहवाल येण्याचे बाकी आहेत आणि आतापर्यंत या विषाणूने ४१ जनांचा बळी घेतला आहे.


आजच्या दिवशी शहरात मनपाने दिलेल्या अहवालानुसार आज शहरात कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण हे ४३ मिळून आले आहेत तर आज कोरोनामुळे मृत्यू झालेला आकडा मात्र आतापर्यंतचा मृत्यूच्या संख्येत अधिक भर टाकणारा आहे आजच्या दिवशी मिरा-भाईंदर मध्ये कोरोनामुळे सर्वाधिक रुग्ण मृत्यू पावले आहेत आज शहरात तब्बल ८ जनांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर आज २२ जण कोरोना मुक्त झाले आहेत. शहरात जर कोरोनाचा थयथयाट थांबवायचा असेल तर नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. सरकारने दिलेल्या सूचनांनचे काटेकोर पणे पालन करणे गरजेचे आहे तरच आपण या माहामारीच्या साथीला रोखू शकतो आणि भविष्यातील होणारा आणि वाढणारा धोका टाळू शकतो यात शंका नाही. म्हणून नागरिकांनी घरीच राहावे  अतिमहत्त्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडावे अन्यथा विनाकाम काम बाहेर फिरू नये जेणेकरून या साथीला आळा घालणे सोपे होईल.