भाईंदर चे चार जण चोरीच्या मार्गाने गुटख्याची तस्करी करणारे गेले गजाआड

महाराष्ट्र मध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंदी असतानाही राज्यात तंबाखूजन्य पदार्थ विक्री केली जाते याकडे जाणीवपूर्वक सरकारच्या अधिकार्‍याकडून आणि कर्मचाऱ्याकडून दुर्लक्ष केले जाते परराज्यातून आणि राज्यातल्या विभागाच्या कानाकोपऱ्यातून चोरीच्या मार्गाने तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी करणारे तस्करी करून आपला व्यवसाय चौकट करतात अशाच काही तस्कर भादरांना वालिव पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत यामध्ये असेही समोर येताना दिसते आहे ही मीरा-भाईंदर मधल्या भाजपा पक्षाच्या नेत्याचा एक भाऊ व  भाजपाचा  कार्यकर्ता या तस्कर टोळीचा भाग आहे.


 


मुंबईला लागूनच असलेल्या मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्र जवळचा जो भाग आहे तो वसई विरार महानगर पालिकेचा त्या भागात येणाऱ्या पोलिस ठाण्याच्या अंतर्गत जाणारा मुंबई-अहमदाबाद महामार्ग आहे या महामार्ग वर गस्तीवर असलेल्या पोलिसांना एका संशयित जाणाऱ्या कार कडे लक्ष गेले आणि त्यांनी या कारची चौकशी केली असता त्यांना त्या कारमध्ये तंबाखूजन्य पदार्थ असलेले अनेक बॉक्स मिळून आले त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा गुटका भरलेला होता जवळपास 55 हजार 960 रुपयाचा हा गुटका त्या गाडीत मिळून आल्यामुळे या आरोपींना पोलिसांनी तात्काळ मुद्देमालासह अटक केली आहे या गाडीमध्ये संदेश वसंत थरथरे ,समीर प्रताप्राव मेहरा, साईनाथ किशोर वाजपेयी, नित्यानंद राम चौरसिया या चौघांना ताब्यात घेतलेआहे हे पकडलेले सर्व जण आरोपी भाईंदर चे रहिवासी आहेत हा या चौघांनी बेत आखून चोरीच्या मार्गाने गुटख्याची तस्करी करत होते या पूर्वी ही असी तस्करी केली आहे का याचाही तपास पोलीस घेत आहेत. हा  गुटका परराज्यातून चोरीच्या मार्गाने आणून मिरा-भाईंदर शहरात विक्री करण्याचा मानस होता


चोरीच्या मार्गाने गुटख्याची तस्करी करणारी टोळी दिनांक 17 जून रोजी सात वाजताच्या दरम्यान चींचोटी गावाच्या हद्दीमध्ये महामार्गाच्या लगत आपल्या हुंडाई नावाच्या चारचाकी एम एच 12 एल जे 128 क्रमांकाच्या गाडीसह मिळून आले त्यांच्यासोबत असलेल्या गाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केसरी'त असले तंबाखूजन्य पदार्थ मिळून आले या मुद्देमालासह आरोपीवरति वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून  गुन्हा नोंदणी रजिस्टर न.  T 596 /2020 भारतीय दंड संहिता कलम 328,269,279,273,188 सह  अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम कलम  26(2) (4) ३०(२)(ए) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 51 (बी) प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे या  कारवाईत एकूण मुद्देमाल 4,55,960 रुपये इतक्या किमतीचा मिळून आला आहे.


 यामधील गंभीर बाब अशी की  राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाच्या आड  एक गैर मार्गाचे व्यवसाय चालले होते का  प्रश्न निर्माण केला जातोय ,, कारण  या गुटका तस्करी टोळी मधील  असलेला आरोपी  संदेश थरथरे हा मिरा-भाईंदर चे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे खंदे समर्थक संजय थरथरे यांचा सख्खा भाऊ असून यात दुसरा समीर मेहता नावाचा भाजपाचा कार्यकर्ता असल्यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.