काशिमिरा वाहतूक शाखा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांच्यावर काळाची झडप

काशिमिरा वाहतूक शाखा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांच्यावर काळाची झडप


 


मिरारोड- कोरोनाच्या विळख्यातून नागरिकांना दूर ठेवण्यासाठी योग्य माहिती देत कर्तव्यदक्ष राहून सेवा देणारे मिरा भाईदर वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल पवार यांना काही दिवसांपूर्वी कर्तव्य निभावतानां कोरोना विषाणू ची लागण झाली आणि त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांची अखेर कोरोनाने प्राणजोत हिरावून घेत काळाने आज त्यांच्यावर उपचारा दरम्यान झडप घातली .


     मिरा-भाईंदर शहरात वाहतूक विभागात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत असतांना आपल्या सहकाऱ्यांना नेहमीच जागरूक आणि दक्ष राहून काम करा , स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या कोरोना पासून काळजी घ्या म्हणून वारंवार उपदेश देऊन आपल्या सहकारी कर्मचारी आणि अधिकारी यांना सोबत घेऊन चोखपणे कर्तव्य निभावत असतांना अचानक त्यांना या कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती मिळाल्यामुळे वाहतूक पोलिस विभागात चिंता वाढली होती. त्यांना सेवन हिल्स , अंधेरी येथे असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना या कोरोना योध्दाने उपचारा दरम्यान ही जवळपास आठदिवस या कोरोनासी झुंज दिली जीवनात अनेक संकटाचा मुकाबला करतांना यश खेचून आणणारे अनिल पवार या कोरोनासी झुंज देतांना पण कोरोनासोबत च्या लढाईत या योद्धयाला अपयश आले. मिरा-भाईदरमध्ये कर्तव्य बजावताना कोविडने त्यांचा बळी घेतला. कोरोना योद्धा म्हणून कोरोना सोबतची लढाई लढत असताना आपले सर्वांचे मित्र श्री अनिल पवार साहेब , वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा काशिमीरा , ठाणे ग्रामीण यांचे नुकतेच कोरोनाशी लढा देत असताना सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांनी आपले प्राण आपल्या सेवेसाठी व देशासाठी कुर्बान केले आहेत. नेहमीच हसतमुख राहून शहरातील नागरिक, पत्रकार, राजकीय,पुढारी,सोबतचे सहकारी यांच्याशी मनमिळाऊ स्वभाव यामुळे त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येक व्यक्ती हा दूर जात नव्हता असा मनमिळाऊ स्वभाव असलेलं व्यक्तिमत्त्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे. देशसेवा देता देता हा योद्धा कोरोनाच्या विषाणूने आपल्या सर्वांपासुन हिरावून घेतला या योद्धाला पोलिस मदत पत्र परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.