मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे शासनाच्या उपायोजना या योजनेचा काहीएक परिणाम होताना दिसत नाही तर रोजच मिळणारे कोरोनाग्रस्तांचे आकडे आता शहरात कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेचा काल आलेला अहवाल चकित करणारा होता. आतापर्यंत येणाऱ्या दररोजचा अहवालाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक करणारा ठरला काल एकाच दिवशी 145 रुग्ण मिळून आल्याने शहरात कोरोना चे प्रमाण रोखण्यात शासनाच्या उपाययोजना कमी पडतात का हा प्रश्न जानकारांमधून व्यक्त होत आहेत.
कोरोना महामारीच्याडी भीषण संकटात दिवसेंदिवस भारतात हे संकट अधिक गडद होत चालले आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्र राज्य हे पहिल्या क्रमांकावर आहे तर मुंबईसारखा महानगरी चा भाग हा या कोरोनाचा बालेकिल्ला ठरत चालला आहे. मुंबई लगतचा परिसरही या कोरोना महामारीच्या विळख्यात येताना दिसतो आहे. ठाणे जिल्हा असेल पालघर पालघर जिल्हा असेल याजिल्ह्यातील अनेक महानगरपालिका क्षेत्र असतील तर क्षेत्रांमध्येही कोरोना विषाणूचा विळखा अधिक गडद होताना दिसत आहे.
या साथीच्या काळामध्ये मिरा भाईंदर महानगरपालिका दररोज कोरोना ग्रस्त रुग्ण मिळून आलेला अहवाल दररोज शहरातील नागरिकांना माहिती साठी देत असते त्यामध्ये दररोज मिळून येणाऱ्या रुग्णांची संख्या, मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या आणि उपचार घेऊन ठीक झालेल्या रुग्णांची संख्या चाचणी घेण्यात आलेली संख्या शहरातल्या वेगवेगळ्या भागात मिळून येणाऱ्या रुग्णांचे अपडेट शहरवासीयांना देण्यात या अहवालाच्या माध्यमातून देण्यात येते त्यामुळे काल जो मनपा च्या माध्यमातून अहवाल प्रसिद्ध करण्यात आला त्या आवाजामध्ये आत्तापर्यंत मिळून येत असलेल्या दररोज च्या रुग्ण संख्येचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. आणि कालचा अहवालानुसार एकाच दिवशी 145 रूग्ण या शहरात मिळून आल्याने शहरात चिंता अधिक वाढली आहे. शासनाच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या उपाय योजना ह्या निष्फळ ठरत आहेत की काय असा तर्क नागरिकांमधून समोर येत आहे. सरकारच्या माध्यमातून ज्या उपाययोजना सुरू आहेत त्या कुठेतरी कमी पडत आहेत की काय असा प्रश्न नागरिकात निर्माण होत आहे. दररोज वाढणारे कोरोना रुग्णांचे आकडे पाहता शहरातले वातावरण अधिक अधिक भितीदायक होत चालले आहे .असे चित्र सध्या तरी पाहायला मिळते आहे कालचा आलेला कोरोना रुग्णांचा आकडा पाहून अनेक जण हि बोलताना ऐकायला मिळाले की ,"आपकी बार सौ पार" आकडा झालेला आहे. यामुळे शहरात अधिक शक्तीची उपाययोजना करणे गरजेचे शहरवासीयांना वाटते आहे म्हणून शासनाने याकडे लक्ष दिले तर नक्कीच कोरोना रूग्णांचा वाढता आकडा थांबविण्यास मदत होईल असे स्थानिक नागरिकांना वाटत आहे.
मिरा-भाईंदर शहरात आतापर्यंत रुग्णांची संख्या १३३८ झाले असून या पैकी काल च्या दिवशी 23 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत बरे होण्याची ६९९ झाली आहे तर कालच्या दिवशी ४ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे हा आकडा आता ७१ वर पोहोचला आहे काल म्हणून आलेल्या रुग्णांपैकी ५४ नवीन रुग्ण आहेत तर ९१ रुग्ण हे बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे संक्रमित झालेले आहेत मीरा रोड भागात ५९ भाईंदर पूर्व आणि पश्चिम भागात ८६ रुग्ण मिळून आले आहेत