मुंबईमध्ये नियम तोडून प्रवेश करणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदीमुळे दहिसर चेकनाका येथे ट्राफिक जाम लांबचलांब लागल्या रांगा
मिरारोड -महाराष्ट्रातील वाढते कोरोनाचे थैमान आणि मुंबई व उपनगरात कोरोनाची होत चाललेली घट्ट मगर मिठी पाहता लॉकडाउन शिथिल केलेल्या परिस्थितीत तोडले जाणारे नियम यामुळे रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी सोमवारी सकाळ पासून लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत शिथिल केलेल्या लॉकडाउन चे नियम तोडून प्रवेश करणाऱ्या वाहनांना पोलिसांनी अडवण्यास सुरवात केली त्यामुळे सगळ्या प्रवेशद्वारावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहयेला मिळाली . नवी मुंबई कडून येणारे वाहने , ठाणे शहराकडून मुंबईत प्रवेश करणारे वाहने या पश्चिम महामार्गावरून येणारी वाहने हे वाहतूक कोंडीत सापडली होती. दहिसर चेकनाका येथून मुंबई मध्ये जाणाऱ्या वाहनांची तपासणी करून अत्यावश्यक असेल तरच त्यांना मुंबईत प्रवेश दिला जात असल्याने दहिसर चेकनाका येथे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दुचाकी वरून फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश तर वाहनांच्या मर्यादेपेक्षा अर्ध्या जणांना प्रवेश करता येईल असे सरकारने जाहीर केले असतांनाही जास्त नागरिक बसलेल्या वाहनांना पोलिसांनी अडवून वाहने रिकामी केली प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात होती त्यामुळे प्रचंड वाहनांची गर्दी झाली.
पश्चिम मार्गावरील मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या मुंबईत दहिसर चेकनाका येथे असलेल्या नाक्यावर वाहतूककोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे ५ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मुंबईत कामानिमित्त जाणाऱ्या चाकरमाण्याचे हाल झाले मुंबईच्या प्रवेशद्वार पोलिसांनी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी सुरू केली असून अनावश्यक फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. शासनाने ३० जून पर्यंत लॉक डाऊन घोषित केलेला असताना, देखील अनेक नागरिक कामासाठी तर काही नागरिक काम नसतानाही वाहने घेऊन घराबाहेर पडत असल्यामुळे बाहेर गर्दी होऊ लागली आहे . परिणामी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळेच पोलिसांनी सरकारच्या आदेशाने पुढाकार घेतला, वाहन तपासणी सुरू केली.
सोमवार सकाळपासून दहिसर चेकनाका येथे नाकाबंदी करत तपासणी करून मुंबईत प्रवेश करण्यास बंदी घालण्यास सुरुवात केली गेली. विना कारण फिरणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली जात आहे. खाजगी वाहनांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जात आहे. पोलिस विभागाकडून कोणत्याही प्रकारचे परिपत्रक किवा संदेश जाहिर केला नसल्यामुळे मिरा भाईंदर , पालघर, विरार, वसई, येथील लोक वाहने घेऊन बाहेर निघाले आहेत.मुंबई मध्ये जाण्यासाठी दहिसर येथून एकमेव रस्ता असल्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दहिसर ते फाउंटन , मालजीपाडा पर्यंत मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या रांगा लागल्यात्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व नागरिकांचे अतोनात हाल झाले. अचानक उद्भवलेल्या परस्थिमुळे प्रवासी, व चाकरमानी यांच्यात मोठी अस्वस्थता दिसून आली.