मीरा भाईंदर मनपा चे आयुक्त बदलले नविन आयुक्त डॉ. राठोड
मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या ठिकाणी डॉक्टर विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे विजय राठोड हे सध्या गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत होते ते प्रथमच महानगरपालिकेचा कारभार या महानगरपालिकेतून पाहणार आहेत राठोड हे बिड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेला आठ वर्षात आठ आयुक्त मिळाले पण या पैकी एकाही आयुक्तांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला नाही. या महापालिकेत आयएएस अधिकारी हे जास्त काळ टिकत नाहीत असेच चित्र पहायला मिळते अशीच आहे.चंद्रकांत डांगे यांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी गडचिरोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली. मिरा भाईंदर मनपा चे सध्याचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी १५ फेब्रुवारी २०२० रोजी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारला होता. चंद्रकांत डांगे यांना या शहराच्या विकासामध्ये हातभार लावण्यासाठी हवा तेवढा वेळच मिळाला नाही असेच म्हणावे लागेल कारण चंद्रकांत डांगे यांची नियुक्ती या मिरा भाइंदर महानगरपालिकेचा आयुक्तपदी झाली सुरवात कामाचा धडाका सुरू होईल असे चित्र दिसत होते दबंग असलेल्या माजी आमदार व माजी महापौर यांचा आशीर्वाद असलेल्या प्रभाग अधिकाऱ्यांनी वाचवलेल्या बांधकामावर हातोडा चालला. त्यामुळे राजकिय दबावाखाली येणार नाहीत हे स्पष्ट झाले होते . कामकाजाची घडी बसण्यास सुरवात झाली व कोरोना च्या साथीने या शहरात पाय रोवले आणि कोरोनाची साथ आल्यामुळे तेव्हापासून या शहरात विकास कामे थांबली आणि पूर्णपणे लक्ष हे कोरोना च्या साथीला रोखण्यासाठी प्रशासनाने केंद्रित केल्यामुळे इतर विकास कामे मात्र रखडली गेली यामुळे शहरातील नागरी व्यवस्थे भरती याचा भविष्यात नक्कीच परिणाम होईल खरंतर या शहरातून लोकांचे प्रतिनिधित्व करणारे स्थानिक लोकप्रतिनिधीही लोकांच्या नागरी सुविधा संदर्भात बोलायला तयार नाहीत शहरात कित्येक समस्या भविष्यकाळात उदभवणार आहेत. शहरातील नागरीसुविधेचे जे अर्धवट कामे झालेली आहेत यामध्ये नालेसफाई असतील,रस्ते असतील, रस्त्यावरील खड्डे, नाल्यांची , गटारांची अर्धवट कामे असतील त्या अर्धवट कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत पण शहरात आणखी पावसाने जोर पकडलेला नसल्यामुळे सध्यातरी त्याचा त्रास जाणवत नाही आणि ज्यावेळेस पावसाची सुरुवात होईल त्यावेळेस नक्कीच या सर्व बाबींचा त्रास शहरवासीयांना होणार आहे यात तिळमात्र शंका नाही. यावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी जेवढे लक्ष द्यायला हवे होते तेवढे मात्र दिले गेले नाही अशा भावना शहरातील नागरिकांमध्ये मिळून येत आहे. चंद्रकांत डांगे यांनीही या बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे या समस्या भविष्यात वाढू शकतात शहरातील नागरिकांना चंद्रकांत डांगे यांच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या कारणे एक आयएएस अधिकारी शहरातील वाढत चाललेल्या नागरी समस्या पासून शहरवासीयां ना दिलासा देण्याचे काम करेल अशी होती आणि शहरातल्या विकासाची चित्र बदलेल असेही वाटत होते पण चंद्रकांत डांगे यांच्याकडून नागरिकांचे अपेक्षापूर्ती नक्कीच झालेली नाही. कोरोनाच्या वाढत्या साथीला रोखण्यासाठी थोडेफार यश मिळाले असले तरीही नेहमीच्या बाकी नागरी सुविधाचां मात्र बोजवारा उडाला हे ही तितकेच खरे आहे. आता नवीन येणारे आयुक्त डॉक्टर राठोड यांच्याकडून या शहरातल्या नागरी समस्या वरती कितपत भर दिला जाईल हे पहावे लागणार आहे आणि नागरिकांचा अपेक्षा आणि शहरातल्या सुविधा या प्रती ती ते किती खरे उतरतील हेही बघावे लागणार आहे की राजकीय कुरघोडीच्या स्पर्धेत आयुक्तांना काम करताना कसरत करावी लागते . त्यामुळे शहरातील नागरिकांच्या समस्या सोडण्यात किती यशस्वी होतील हे मात्र येणारा काळच ठरवेल अशीही भावना नागरिकांमध्ये आहे.
नवीन आयुक्त डॉ विजय राठोड यांना महापालिकेच्या कामाचा अनुभव नसून यांची आयुक्तपदी ही पहिलीच वेळ आहे. इथे असलेले नेहमीचे राजकीय दबावतंत्र पाहता त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.