मिरा-भाईंदर च्या कोव्हिडं रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात नविन बेड वाढण्याची शक्यता

मिरा-भाईंदर च्या कोव्हिडं रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात नविन बेड वाढण्याची शक्यता



मिरा-भाईंदर मध्ये कोरोनाचा विळखा अधिक गडद होत चालला आहे. दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण वाढत आहेत त्यामुळे मिरा-भाईंदरचे एकमेव कोव्हिडं रुग्णालय असलेले भीमसेन जोशी रुग्णालयात जागा कमी पडत आहे तर अतिदक्षता विभागात व्हेटिलेर ची कमतरतेमुळे तारांबळ उडते आहे त्यामुळे अधिक प्रमाणात व्हेंटिलेटर उपलब्ध होणे आवश्यक आहे या साठी मनपाने सरकार कडे तशी मागणी केली असून लवकरच अतिदक्षता विभागात नविन व्हेंटिलेटरसह बेड वाढवले जातील अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे .


 


मिरा-भाईंदर वाढती लोकसंख्या त्याच बरोबर कोरोना संक्रमणाचे वाढते रुग्ण आणि दररोज अतिदक्षता विभागात वाढते रुग्ण त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर ची कमतरता पडत आहे. त्याच बरोबर शहरातील खाजगी रुग्णालयांतील व्हेंटीलेटर्सची संख्या देखील मर्यादित असल्याने रुग्णांना व्हेंटीलेटरयुुक्त बेडस् मिळवून देताना नातेवाईकांची धावपळ उडते. 


जोशी रुणालयातील अतिदक्षता विभागातील बेडची क्षमता 45 ने वाढविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असुन राज्य शासनाकडे अतिरीक्त 45 व्हेंटीलेटर्सची मागणी करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. 


 


भाईंदर येथील भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी हे एकमेव शासकीय रुग्णालय पालिकेने कोविड 19 रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. त्यावर पालिकेकडून नियंत्रण ठेवले जात असुन त्यात सुमारे 250 बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अतिदक्षता विभागात सध्या 20 बेडस् उपलब्ध असुन व्हेंटीलेटर्सची संख्या 18 इतकी आहे. तर उर्वरीत बेडस् कोरोनाग्रस्त व संशयित कोरोनाग्रस्तांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.कोरोनाग्रस्तांना अतिदक्षता विभागात बेडस् उपलब्ध होत नसल्याने त्यांना शहराबाहेरील खाजगी रुग्णालयांत धाव घ्यावी लागत आहे. त्यात रुग्णांवरील उपचाराला विलंब होऊन तो दगावण्याची शक्यता निर्माण होते.


अशातच जोशी रुग्णालयासह शहरातील खाजगी रुग्णालयांतील व्हेंटीलेटर्सची संख्या देखील मर्यादित असल्याने रुग्णांना व्हेंटीलेटरयुुक्त बेडस् मिळवून देताना नातेवाईकांची धावपळ उडते. यामुळेच शासनाकडे अतिरिक्त ४५ व्हेंटीलेटर्सच्या मागणीचा प्रस्ताव करण्यात आला असून त्याला लवकरच मंजूरी मिळणार असल्याची शक्यतआयुक्तांनी व्यक्त करुन अतिरीक्त व्हेंटीलेटर्समुळे गंभीर कोरोनाग्रस्तांवरील उपचाराचा विलंब टळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.