महापौरांच्या प्रभागातिल अवैध बांधकामांना  महापौरांचा छुपा पाठिंबा अधिकाऱ्यांच्या संगनमताने होते वसुली, आयुक्तांसमोर अनधिकृत बांधकाम रोखण्याचे मोठे आवहान

महापौरांच्या प्रभागातिल अवैध बांधकामांना  महापौरांचा छुपा पाठिंबा अधिकाऱ्यांच्या संगनमताने होते वसुली, आयुक्तांसमोर अनधिकृत बांधकाम रोखण्याचे मोठे आवहान 


मुंबईला लागून असलेल्या मीरा-भाईंदर शहरांमध्ये जसे कोरोनाचे  रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत तसेच महापौरांच्या प्रभागात अनाधिकृत बांधकाम दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून सतत वृत्तपत्रातून सदरील अनधिकृत बांधकामांच्या बातम्या प्रकाशित केल्यानंतर ही  प्रभागातील नगरसेवक आणि प्रभाग अधिकारी संगणमत करून अनाधिकृत बांधकामे ला वाचवण्याचा विडाच उचलला आहे की काय ? शहरात नागरिकामध्ये जोरदार चर्चा सुरू आहेत.


 


मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये असलेले चार नगरसेवक आणि या या शहराच्या महापौर घेऊन या प्रभागांमधून निवडून आलेल्या आहेत पण त्या आपल्या प्रभागातील अनधिकृत बांधकाम रोखण्यास टाळाटाळ करत असल्याचे नागरिक बोलत आहेत, या वाढत्या अनधिकृत बांधकामांना महापौरांसह स्थानिक नगरसेवक सचिन म्हात्रे, मीरादेवी यादव आणि सुजाता पारधी, यांचाही छुपा पाठिंबा या प्रभागात होत असलेल्या अनधिकृत बांधकामांना असल्याची शंका नागरिक उपस्थित करीत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून सतत शहरात या अनधिकृत बांधकामाच्या चर्चा जोरदार सुरू असतानाही स्थानिक नगरसेवक मात्र मूग गिळून गप्प आहेत. तर प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे हे आपले सहकारी इंजिनियर संदीप साळवे यांच्या मदतीने या अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांकडून जोरदारपणे वसुली करून त्याचा काही मलीदा स्थानिक नगरसेवक आणि महापौरांच्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. असा आरोप स्थानिक नागरिकांनी लावण्या सुरू केला आहे त्यामुळे नक्की पाणी कुठे मुरते हा प्रश्न समोर येताना दिसत आहे. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांचा छुपा पाठिंबा आहे का ? असा प्रश्न शहरातल्या नागरिक आज चर्चा करताना दिसत आहेत. त्यामुळे या प्रभागातला अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न समोर अवहान उभा करणारा ठरला आहे प्रभाग अधिकारी महापौर आणि स्थानिक नगरसेवक यांच्या छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अजिंड्याला सुरुंग लावण्याचे मोठे आव्हान मीरा-भाईंदर मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्यासमोर उभे टाकले आहे. आता हे पाहावे लागणार आहे की चंद्रकांत डांगे हे राजकीय शक्ती पुढे हतबल होतील ? की प्रभाग अधिकारी आणि इंजिनियर यांच्यावरती कडक कारवाई करतील आणि वाढत असलेले हे बांधकाम रोखतील काय ?सुरू असलेले बांधकाम तोडतील काय ? या प्रभागात फोपावलेल्या माफियांना लगाम बसवतील काय ? त्यांच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी होतील काय ? देशात सुरू असलेल्या कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानांच्या महामारीच्या काळात या  चाळमाफियांनी प्रभाग अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक याना हाताशी धरून मांडलेला उच्छाद थांबवतिल का ? 


प्रभाग समिती क्र. ६ चे इंजिनियर संदीप साळवे हे  प्रभाग क्रमांक १४ मध्ये चाललेल्या अवैध बांधकामांच्या साईट वरती जाऊन कारवाई करण्याची धमकी देऊन ,भीती दाखवतात आणि या चाळमाफियांकडून, ठेकेदाराकडून लाखोचा मलिदा वसूल करण्याची जबाबदारी पार पाडतात स्थानिक नगरसेवकांना, महापौरांचा हिस्सा त्यांच्या माध्यमातूनच पोचवला जात असल्याची चर्चादेखील प्रभागात रंगली आहे. ठेकेदारांच्या चर्चेतला सूर तर असा आहे की, इंजिनियर संदीप साळवे यानां भेटून काम केल्यानंतर कामाची एक  ईट ही तुटत    नाही अशी दबक्या आवाजात चर्चा ठेकेदार यामध्ये आणि चाळमाफियामध्ये सुरुु आहे. यामुळे आयुक्त  चंद्रकांत डांगे यांना आपल्या कर्मचाऱ्यांकडू उभे केलेले आवहान पेलावे लागणार आहे त्यामुळे हे आवहान पेलण्यास आयुक्त्त्त महोदय हे किती यशस्वी होतील हे येणाऱ्या काळात करावे लागणार आहे.


त्याचबरोबर या प्रभागात भुरट्या पत्रकारांचा ही सुळसुळाट  पाहायला मिळत आहे. इंजिनीयर संदीप साळवे पत्रकारांची भीतीही दाखवून पैसे उकळत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. कोणत्याही वृत्तपत्रात काम न करणारे बोगस पणे पत्रकार असल्याचे सांगून ,पत्रकार असल्याचे भासवून या अवैद्य बांधकामदाराकडून ,चाळ माफियांकडून वसुली केली जात असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे शहरातल्या पत्रकार बदनाम होताना दिसत आहेत. बोगस पत्रकार हे पत्रकारांची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत आहेत याला ही लगाम बसने गरजेचे आहे असे नागरिक बोलून दाखवत आहेत. या संदर्भातील वृत्त लवकरच आम्ही देण्याचा प्रयत्न ही करणार आहोत.


 


प्रतिक्रिया


ठेकेदारांना काम करण्याची परवानगी मनपाचे अधिकारी वर्ग देतात पण कोणी गरीब व्यक्ती जर छोटे जरी घराची डागडुजी करत असेल तर मनपाचे अधिकारी येऊन तोडतात आणि या चाळी उभ्याकरणाऱ्याची मात्र एक ईट ही तुटत नाही. या चाळी बनवनाऱ्या ठेकेदाराचे आणि  अधिकाऱ्यांचे लागेबांधे बांधलेले आहेत याला छुपा पाठिंबा स्थानिक नगरसेवक की देत आहेत त्यामुळे ठेकेदार आपल्या मर्जीप्रमाणे अनाधिकृत बांधकामे उभी करतात या मनमर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.


नरेंद्र उपरकर - स्थानिक( शिवसेना शाखाप्रमुख मीरा गावठण).


प्रतिक्रिया


स्थानिक लोकप्रतिनिधीं आणि अधिकारी यांच्या हा संगनमतानेच हा खेळ आहे. त्यांच्या संगणमताशिवाय प्रभागात असे जोरदारपणे अवैध बांधकाम सुरू राहूच शकत नाही. या चाळमाफियांकडून अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही कामे होत आहेत यात शंका नाही या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे आयुक्त चंद्रकांत डांगे लक्ष कधी देणार हे महत्वाचे आहे.


वैशाली कुंभार - स्थानिक रहिवाशी.


प्रतिक्रिया


ठेकेदार आणि  अधिकारी यांची साखळी आहे यामुळे अनधिकृत बांधकामे तोडली जात नाही यासाठी सा साखळी भाग बनून या परिसराचे नगरसेवक छुप्या पद्धतीने काम करतात म्हणून अनाधिकृत होत असलेल्या बांधकामांना की सगळेच जिम्मेदार आहेत. 


विलास व्हावळे - नागरिक