अधिकाऱ्यांच दुर्लक्ष आणि ठेकेदारांची मनमानी मिरा-भाईंदर शहराला यावर्षी ही जलमय करणार

मीरा भाईंदर महानगरपालिका ही मुंबई लगत असलेली महानगरपालिका आहे. एका बाजूला समुद्र किनारा तर दुसऱ्या बाजूला खाडी किनारा व पूर्वेला राष्ट्रीय जंगल असलेला भाग आणि एका बाजूला मुंबईची सीमा असलेल महानगर क्षेत्र आणि या क्षेत्रात दरवर्षी पावसाळ्यात या शहराचा बराच भाग पूर्णपणे पावसाच्या पाण्याखाली जाऊन जलमय होत असतो. शहरातली परिस्थिती धोकादायक वळणावर येत असते तर जनजीवन विस्कळीत झालेले पहायला मिळते. यावर्षीही हे चित्र पाहायला मिळणार यात काही शंका नाही असे शहरातील  नागरीकांना वाटते आहे.


मिरा-भाईंदर हे शहर वाढत्या विकासाबरोबरच अनेक समस्या सोबत घेऊन वाढत आहे. वाढती लोकसंख्या अवैध मातीभराव ,अनाधिकृत बांधकामे, पाणी वाहण्याचे नैसर्गिक स्तोत्र बंद झाले आहे तर अनेक ठिकाणी अरुंद झालेले नाले, मातीभराव, अनधिकृत बांधकामे नाल्याच्या भिंतीवर वाढते अनधिकृत बांधकाम या मुळे नालेसफाईचा प्रत्येक वर्षी बोजवारा उडत असतो. प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी नालेसफाई साठी चे बजेट दरवर्षी वाढत चाललेले असतानाही ही नालेसफाई मात्र शहरातील नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करणारी केली जाते. जनतेने दिलेल्या कर रुपी पैशातून दिला जाणारा नालेसफाईचा ठेका, ठेकेदाराची राजकीय वशिलेबाजी व अधिकाऱ्यांचे कमिशनरुपी वागणे शहराला दरवर्षी पाण्याखालील डुबवत आलेले आहे. आणि या वर्षी पुन्हा ही शहर पाण्याखाली डुबणार अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई योग्य प्रकारे होणे गरजेचे असतानाही ठेकेदार आपल्या मर्जीप्रमाणे काम करून मोकळे होतात. म्हणून मर्जीप्रमाणे चाललेल्या कामाकडे अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष झालेले आहे. यामुळे संगनमताने केलेला हा नालेसफाईचा दिखावा शहराला प्रत्येक वर्षी पाण्याखाली नेण्यास कारणीभूत ठरत आहे. तशीच परिस्थिती यावर्षीचीही आहे. मीरारोडच्या काशीमीरा विभागात सर्वात जास्त मोठे नैसर्गिक नाले आहेत या नैसर्गिक नाल्याची पावसाळ्यापूर्वी साफसफाई होणे महत्वाचे आहे याकरिता महानगरपालिकेच्या माध्यमातून खाजगी कंपन्याना याकामी नेमणूक करण्यात येत असते ठेका पद्धतिने ठेका खाजगी कंपनीला दिला जातो तसाच ठेका बजेट वाढवून यावर्षीही एका कंपनीला नालेसफाई च्या कामांकरिता यावर्षी देण्यात आला आहे पण शहरातल्या मोठमोठ्या नाल्यांना नालेसफाईसाठी हातच लागला गेलेला नाही त्यामुळे या नाल्यांमध्ये जंगलातून वाहून आलेला गाळ, माती, कचरा, दगड ,जशास तसा पडून आहे याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नालेसफाई करण्यात आलेली नाही. नालेसफाईच्या कामात निष्काळजी केली गेली साफसफाई न करतात ठेकेदार हा नालेसफाईचे 100% बिल घेणार आणि अधिकारीही बिल देणार हा आंधळा कारभार या शहरातली जनता किती दिवस उघड्या डोळ्यांनी बघणार असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. मीरा रोडच्या भागात नॅशनल पार्कच्या जंगलातून  येणारे अनेक नाले आहेत त्यामध्ये गावठाणचा नाला, बाबळी ची भाट वस्ती लगत जाणारा नाला, मांडविपाडा येथील असलेले दोन नैसर्गिक नाले. माशाचा पाडा येथून जाणारे नाले डाचाकूलपाडा चैना आणि चैनाच्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या आदिवासी वसाहती असलेले पाडे येथून  जाणारे नैसर्गिक नाले या नाल्याच्या मुळे पाण्याखाली जाणारा बराचसा भाग अनेक भागाला हे नाले छेदून जातात ज्यामध्ये साई पॅलेस, दिव्या पॅलेस ,वेस्टन,दारा, हॉटेल, वेस्टन पार्क, राज रियालिटी, सह साईकृपा कॉम्प्लेक्स मनाली कॉम्प्लेक्स, ग्रीन व्हिलेज कॉम्प्लेक्स, मिनाक्षी नगर वसाहत, आसपास चा भाग काशिगाव ,मिरागाव ,मुन्शीकंपाउंड पेनकर  पाड्याचा भाग ,हटकेश, सिल्वर सरिता, 22 नंबर बस स्टॉप कडे असलेला हटकेचा परिसर घोडबंदर कडे जाणारे नाले अशा कित्येक भागामध्ये हे नाले पसरले असल्यामुळे हा भाग पूर्णपणे पाण्याखाली जलमय होतो जनजीवन विस्कळीत होते अनेकांच्या घरांमध्ये, दुकानांमध्ये ,कारखान्यांमध्ये, हॉटेल मध्ये या नाल्यातून येणारे पावसाचे पाणी भरल्यामुळे सामानाचे व आर्थिक नुकसान होते त्याचबरोबर या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना, नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होतो गेल्यावर्षी पाण्याखाली गेलेल्या हॉटेलमध्ये वीज (करंट) उतरल्यामुळे काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या उदभवणाऱ्या गंभीर परिणाम कडे लक्ष देणे आवश्यक होते पण तसे झालेले नाही त्यामुळे हे शहर यावर्षीही पाण्याखाली डूबणारच यात काही शंका नाही.