कोरोनाच्या वाढता कहर यामुळे सरनाईक यांचा प्रतिवर्षी दिमाखात होणारा दहीहंडी उत्सव रद्द 

कोरोनाच्या वाढता कहर यामुळे, आमदार प्रताप सरनाईक यांचा प्रतिवर्षी दिमाखात होणारा दहीहंडी उत्सव रद्द 


 


कोरोनामुळे देशात साजरे होणारे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम या वर्षी घरीच राहून साजरे करण्याचे आवाहन सरकार कडून करण्यात आले आहे. यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केले आहे. तर त्यासोबतच येणारा दहीहंडीचा सण ही असतो तो या वर्षी रद्द करण्याचे निर्णय अनेक मंडळाकडून घेतले जात आहेत. त्यामुळे आमदार प्रताप सरनाईक यांच्या मंडळाची प्रसिद्ध असलेली दही हंडी सोहळा या वर्षी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.


 


 देशात आणि राज्यात व मुबंई आणि लगत च्या भागात मोठया प्रमाणात कोरोनाचे थैमान सुरू आहे त्यामुळे या सणावर देखील कोरोनाचे सावट पसरले आहे. दहीहंडीचा सणही महाराष्ट्रात अतिशय उत्साहात साजरा केला जातो. परंतु, यंदा कोरोनामुळे हा सण साजरा करणे शक्य होणार नाही. दहीहंडी उत्सव पहाणाऱ्यांची संख्याही मोठी असते. त्यामुळे या सणाच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगसह विविध नियमांचे पालन होणार नाही. सामाजिक दुरी ठेवणे गरजेचे आहे व दहीहंडी मध्ये एकमेकांचा आधार घेऊन थर लावले जातात. हजारो लोक येथे जमतात. यंदा आपल्यापुढे कोरोना चे मोठे संकट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन यंदा संस्कृती युवा प्रतिष्ठानची प्रसिध्द दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेत असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.


 


प्रो गोविंदा ही संकल्पना संस्कृती युवा प्रतिष्ठानने आणली. या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन तरुण पुढे येत असून हंडीत तब्बल ९ थरांचा जागतिक विक्रम झाला त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवली गेली आहे. त्यामुळे दरवर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी अतिशय उत्साहात साजरी होते. हजारो गोविंदा, नागरिक या दहीहंडीला उपस्थिती दर्शवतात. दहीहंडीचा समावेश खेळ या प्रकारात समावेश व्हावा यासाठी प्रताप सरनाईक यांनी पाठपुरावा केला आणि दहीहंडीला शासनमान्यता प्राप्त करून दिली. दरवर्षी दहीहंडी उत्सव प्रचंड उत्साहात साजरा होतो. परंतु, सध्याची परिस्थिती लक्षात घेता हंडी रद्द करणे हेच प्रत्येकाच्या आरोग्याच्या व समाजाच्या दृष्टीने योग्य आहे मात्र , हा सण साजरा करताना मोठ्या प्रमाणावर तरुण गोविंदा एकत्र येतात. जर गोविंदा उत्सवात गर्दी झाली, तर सध्या सरकार करत असलेल्या उपाययोजना फोल ठरण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करून आणि मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार यंदा आम्ही संस्कृती प्रतिष्ठानची हंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला असून विविध प्रकारची पारितोषिके तसेच इतर नियोजनापोटी होणारा खर्च कोरोनाच्या पार्श्वभूमीवरत्या खर्चाच्या बदल्यात एक करोड रुपयाची औषधे ठाणे आणि मिरा-भाईंदर परिसरात नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी वापरले जाणार आहेत त्यामध्ये आर्सेनिक अल्बम ३० या ३ लाख गोळ्या आतापर्यंत वाटप केल्या आहेत.त्या बरोबर एक सॅनिटायझरची बॉटल , मास्क व काही औषधे घरोघरी जाऊन वाटप केले जाणार आहे. त्याच बरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २७ जुलै रोजी मीरा भाईंदर शहरासाठी व्हेंटिलेटरयुक्त दोन ऑबुलन्स दिली जाणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.


आमदार प्रताप सरनाईक यांनी मानव सेवा हीच ईश्वर सेवा लक्षात ठेवून हा उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत लॉक डाऊनच्या काळात हजारो नागरिकांना जेवण वाटप केले. त्यानंतर सर्व इमारतीत जाऊन सॅनिटायझर करणे, 


. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 


शाखा तिथे दवाखाना ७८ ठिकाणी सुरू केलेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या या काळात सर्दी , खोकला , ताप, पैरासेट्मल गोळी,एसिडिटी चे औषध , कफसिरप , वरिष्ठ नागरिकांसाठी मल्टी विटामिन सिरफ,बॉडी पेन साठी ट्यूब व इतर आवश्यक औषधे दिली जात आहेत. या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल तसेच नागरिकांना सुविधा उपलब्ध होईल त्यामुळे शाखा तिथे दवाखाना सुरू केला आहे. आ. सरनाईक यांनी आपला व्यक्तिगत खर्च करून ही सुविधा शहरातील नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सत्ताधारी हे महासभा किंवा स्थायी समिती सभा घेण्याची आवश्यकता नाही हे सर्व रद्द करून कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लक्ष देणे गरजेचे असून यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे असे आमदार सरनाईक म्हणाले.