zoom app वापरणाऱ्या नागरिकांनी सावध राहा


 


मुंबई – कोरोनामुळे सध्या देशात उद्भभवलेली परिस्थिती या काळात बरेच नागरिक वर्क फ्रॉम होम करत असल्यामुळे मिटींग्ज करिता वापरायला सोपे असल्याने zoom या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे.सायबर भामट्यांनी भामट्यांनी झूम ॲप्स सारखे नकली बनवल्यामुळे zoom झूम ॲप वापरणाऱ्यांना धोका होऊ शकतो त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.


अनेक ऑनलाईन काम करणारे नागरिक आपल्या सहकार्या सोबत मीटिंग चर्चा माहिती शेअर करण्यासाठी या ॲपचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत अनेक सॉफ्टवेअर जरी मार्केटमध्ये असल्या तरी मॅप हे वापरण्यास सोपे असल्यामुळे ॲप्स चा वापर जास्त प्रमाणात होत असल्याचे पाहून त्यावर मधल्या भामट्यांनी याचा गैरफायदा उचलल्यास सुरुवात करण्याचे षड्यंत्र आखलेले दिसते आहे त्यामुळे या एकसारखीच दिसणारे ॲप समाज माध्यम वरती वायरल करून लोकांना फसविण्याचा होंडा राहू शकतात त्यामुळे नागरिकांनी सावध होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सायबर विभागाकडून सर्व नागरिकांना विशेष करून zoom app वापरणाऱ्यांना आवाहन करीत आहे, कि हे अॅप वापरताना सावध राहा. सायबर भामट्यांनी zoom app सारखे फेक अँप्स बनवली आहेत. तुम्ही जर ती डाउनलोड केलीत तर तुमच्या सर्व मिटींग्ज रेकॉर्ड होतील व तुमची सर्व माहिती या भामट्यांना मिळू शकते मिळू शकते व तुमच्या device (मोबाईल /संगणक) चा ताबा देखील हे सायबर भामटे घेऊ शकतात आणि त्याचा झोका तुम्हाला पत्करावा लागेल म्हणून सावध होणे आवश्यक आहे. 


तरी सर्व नागरिकांनी झूम अॅप हे अधिकृत वेबसाईट किंवा प्लेस्टोअरवरूनच डाउनलोड करावे . शक्यतो कुठलीही कुठलेही अतिशय महत्वाची माहिती गोपनीय असे अशी माहिती अशा मिटींग्समध्ये बोलणे टाळून वैयक्तिक आपल्या सहकार्याची संपर्क साधूनच देणे गरजेचे आहे त्याचबरोबर मीटिंग ठेवणाऱ्या व्यक्तीने पासवर्ड किंवा अन्य महत्वाचे कोड हे प्रत्येकाला वैयक्तिक रित्या बोलू देणे महत्वाचे ठरेल ऑनलाइन संबंधातील कोणतीही मिटिंग ऍडमिन /होस्टने फक्त मिटिंगच्या विषयाच्या संबंधित व्यक्तींची लॉगिन रिक्वेस्ट एक्सेप्ट करावी.


जर कोणी मीटिंग लावणारे व्यक्ती असेल तर त्यांनी काही गोष्टी ती काळजी घेणे आवश्यक आहे. 


 त्यामध्ये


१) तुम्हाला जो रॅण्डम मीटिंग आयडी पासवर्ड मिळेल त्याचाच शक्यतो वापर करा, आपला कुठलाही आयडी किंवा पासवर्ड वापरणे टाळावे. 


२) तुमची मीटिंग अन्य कोणी रेकॉर्ड करणार नाही यासाठी सेटिंग मध्ये बदल करून त्याची काळजी घ्यावी.


३) मिटींग मध्ये उपस्थित राहणारे सर्व सदस्य आल्यानंतर या मिटींगला लोक करावे जेणेकरून दुसरा कोणताही बाहेरचा सदस्य या मीटिंगमध्ये येणार नाही याची काळजी घ्या. 


४) ऑनलाइन मीटिंगची अशी शूटिंग करावी की जेणेकरून तुमच्या परवानगीशिवाय कोणीही इतर व्यक्ती तुमच्या परवानगी शिवाय सहभागी होऊ शकणार नाही.  


५) तुम्ही ,जर काही कारणाने मिटींग सोडून जात असाल किंवा मिटिंग संपली असेल तर leave मिटींग वापरता न करता समाप्त मिटिंगचा वापर करणे आवश्यक आहे.


६) मिटिंगची लिंक id व पासवर्ड ओपन फोरम वर शेअर करू नका. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे