मिरा-भाईंदर शहरात कोरोनाने आतापर्यंत घेतला १५२ नागरिकांचा बळी
मिरा-भाईंदर शहरातील जनता कोरोनासी झुंज देत आहे तर मनपाचा नियोजन शून्य कारभार सत्ताधाऱ्यांची अनदेखी या वाढता संसर्ग व मृत्यू थांबवण्यास जबाबदार आहे असी ओरड शहरातील जनतेतून होत असतानाच शहरातील कोरोना बळीचा आकडा १५२ वर पोहचला आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडे अपुरी असलेली वैद्यकीय सुविधा आणि वाढते रुग्ण आणि होणारे रुग्णांचे हाल पाहता व प्रशासना कडे व्हेंटिलेटरची असलेली कमतरता रुग्णांचे जीव धोक्यात जात आहेत असेच चित्र सध्यातरी शहराचे बनले आहे.
शहरात काटेकोरपणे लॉकडाऊन आतापर्यंत पाळले गेले आहे लॉक डाऊन मुळे सर्वसामान्य लोकांची झालेली गंभीर आर्थिक स्थिती निर्माण झाली आहे. सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले गेले आहे आता घर चालवणे ही त्याच्या साठी कठीण झाले आहे अशी परिस्थिती बनली असतांनाच शहरात मात्र कोरोना रुग्ण मिळण्याचे प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. मृत्यू चा आकडा ही वाढत चालला आहे. शहरातील वाढत्या कोरोनाने आत्तापर्यंत १५२ नागरिकांचा बळी घेतला आहे.
शहरातिल चिंताजनक परस्थिला आवरणे कठीण झाले आहे मात्र नेते या परिस्थितीत बोलायला तयार नाहीत सगळे शांत आहेत जसे काही शहरात काहीच घडत नाही असे चित्र पहावयास मिळते आहे. तर एकीकडे कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी करोडो रुपये खर्च केला जातो आहे. पण अपुऱ्या नियोजनामुळे शहरातील नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. साथीच्या काळात करोडोचा होणारा खर्च हा वाया जात आहे का हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मानत निर्माण झाला आहे.