दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उद्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी एक च्या नंतर मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे.
शिक्षणा हे मानवाचा तिसरा डोळा म्हटले गेले आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "शिक्षण हे वाघणीचे दूध आहे जो कोणी हे दूध प्राशन करील तो अन्याया विरुद्ध गुरगुरल्या शिवाय राहणार नाही" शिक्षणामुळे प्रगतीची द्वारे खुलतात अनेक पालक आपल्या मुलांना शाळेत प्रवेश देऊन त्याला या प्रगतीच्या प्रवाहात उभे करतात सध्याच्या काळात आयुष्याचा पहिला टप्पा बोर्डाचा सुरू होतो दहावी पासून बोर्ड सुरू होतात यावर्षी दहावीचा निकाल उशिरा जाहीर केला जात आहे. दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. पण यावर्षी कोविड 19 च्या पसरलेल्या साथीमुळे दहावीचा निकाल उशीरा लागत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उद्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट
mahahsscboard.
maharashtra.gov.in,
mahresult.nic.in वर विधार्थ्याना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
दहावीची परीक्षा ही 3 मार्च 2020 ते 23 मार्च 2020 दरम्यान घेण्यात आली. याच काळात कोविड 19 च्या साथीचा संसर्ग वाढण्यात सुरवात झाली यामुळे सरकारने दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. 2020 मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यी बसले होते. यामध्ये 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी, तर 7 लाख 89 हजार 898 विद्यार्थिनी परिक्षेत बसल्या होत्या.