पाच अधिकारी आणि पंचवीस कर्मचारी कोरोनाने संक्रमित
मिरा-भाईंदर मधिल नयानगर पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांत कोरोना संक्रमणाचे प्रमाण अधिक वाढत आहे. आतापर्यंत एकूण असलेल्या संख्येपैकी चौवतीस टक्के पोलिसानां कोरोनाने संक्रमित केले आहे. त्यामुळे इतर कर्मचारीही भीतीच्या छायेखाली काम करतांना दिसत आहेत.
मीरा भाईंदरमध्ये एकीकडे कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. तर त्याची प्रचिती पोलिस ठाण्यात देखिल दिसून येत आहे. नयानगर पोलिस ठाण्यात आता पर्यंत ३० पोलिस कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. कोरोनाने शहरभर थैमान घातले आहे त्यामधून पोलिस ही सुटले नाहीत असेच चित्र सध्याचे दिसत आहे. शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढुनये म्हणून काम करणारे पोलिसच कोरोनाच्या संपर्कात येतांना दिसत आहेत. काशिमिरा पोलिस ठाणे असो या मिरा-भाईंदर मधिल कोणतेही पोलिस ठाणे असो जिथे कोरोनापोहचला नाही असे नाही. कोरोनाशी लढा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. मिरा रोडच्या नया नगर पोलीस ठाण्यामध्ये काम करणाऱ्यांना आतापर्यंत ३० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये पाच अधिकारी आणि पंचवीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाची बाधा झाली आहे. या पोलिस ठाण्यातिल कोरोना संक्रमणाचे प्रमाण चौवतीस टक्के एवढे दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने अपुऱ्या सुविधा मिळत नसल्याने हे प्रमाण वाढत आहे असे कर्मचाऱ्यांना वाटते आहे.
कोरोनासी झुंज देऊन कोरोनावर मात करून पुन्हा आठ कर्मचारी हजर राहून सेवा बजावत आहेत, तर काही कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर काही कर्मचाऱ्यांनी स्वतःला घरातच विलगीकरण करून घेतले आहे. नया नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एकूण पोलिसांची संख्या १०२ आहे . त्यापैकी ३० कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यामुळे पोलिस ठाण्यात काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. तसेच कोरोनाची भीती सुद्धा निर्माण झाली आहे. कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांची देखील कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्यांचा वैद्यकीय अहवाल प्रतीक्षेत आहे. कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, तर पोलीस निरीक्षकांनीदेखील अनेक कर्मचाऱ्यांनी कोविडची चाचणी केली आहे. त्यांचा वैद्यकीय अहवाल येण्याचे बाकी आहेत अहवाल आल्या नंतरच चित्र स्पष्ट होणार आहे की किती कर्मचारी कोरोनाने बाधित झाले आहेत. यामुळे एक मात्र नक्की कि कोरोनासाथीचा फटका पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात बसत आहे.