मुंबईला लागूनच असलेल्या मिरा -भाईंदर शहराची चिंता अधिक वाढत आहे. कोरोनाचे हॉस्पॉट होण्याच्या मार्गावर असलेली परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातली सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी कोरोनाच्या विळख्यात जाता जाता नियंत्रणात आली पण मीरा भाईंदर मनपाची स्थिती मात्र बिकट होत आहे. मिरा-भाईंदर मनपा दररोज स्वतःचेच रेकॉर्ड स्वतःच तोडत आहे. मनपा प्रशासनाचे ढिसाळ नियोजन हे शहराला हॉस्पॉट बनवतय का ? या प्रश्ना बरोबरच सत्ताधाऱ्यांच दुर्लक्ष की थंडावलेले विरोधक याला जबाबदार आहेत का ? की याला नक्की कोण जबाबदार आहेत हा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण झाला आहे.
मुंबई लगत असलेली मीरा-भाईंदर महानगरपालिका मुंबईचे एक प्रवेशद्वार आहे त्या छोट्या शहरांमध्ये कोरोनाचे थैमान सुरू आहे. यावरती नियंत्रण आणण्यात मनपाला अद्याप तरी यश आलेले नाही गेल्या काही दिवसापासून मीरा भाईंदर महानगरपालिका दररोज मिळून येणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत दररोज स्वतःचे रेकॉर्ड स्वतः तोडताना दिसत आहे. दररोज मिळून येणारी कोरोना रुग्णांची संख्या ही या शहराची चिंता वाढवणारी बाब बनली आहे. मिरा-भाईंदर मधिल जनतेने या शहराचा अभ्यास, जाण, परिस्थितीची माहिती असलेल्या लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. ते जनतेचे प्रतिनिधी मात्र शहरात उभे रहात असलेल्या कोरोनाच्या संकटावर मात्र ब्र काढायला तयार नाहीत त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांची चुपी का हा प्रश्न विचारला जात आहे. कोरोना संक्रमणाचा फटका शहरातल्या आमदार सह काही नगरसेवक पत्रकार,पोलिस, सेवा देणारे मनपा कर्मचारी यांनाही बसला आहे. एका नगरसेवक,पोलिस अधिकारी आणि पत्रकाराचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. तर शहरात कोरोनामुळे आतापर्यंत बळी दीडशे पार गेलेले आहेत. शहरातली खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची होत असलेली लूट पाहता सत्ताधारी व विरोधक आणि मनपा शासन लक्ष देत नाहीत अनियंत्रित लूट सुरू आहे.पण कोणीही ब्र काढायला तयार नाहीत याचे कारण काय हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉक्टर विजय राठोड हे मीरा-भाईंदर मधल्या बिघडलेल्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यात यशस्वी होतील काय हाही एक चर्चेचा विषय बनला आहे . शहरातील नागरिकांना डॉक्टर असलेल्या महोदया कडून अपेक्षा तर नक्कीच आहे त्यात ते किती यशस्वी होतील हे मात्र येणारा काळच ठरवेल. आज २७६ रुग्ण-बाधित आढळून आले आहेत तर शहरातील आजपर्यंत एकूण ३८८५ रुग्ण झाले आहेत तर आज तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे आतापर्यंत शहरात एकूण १५२ मृत्यू झाले आहेत तर आज करोना मुक्त १५० रुग्ण -झालेआहेत तर
आतापर्यंत शहरात करोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या-२८१८ झाली आहे. सध्यस्थितीत ९१५ रुग्ण उपचार घेत आहेत.