कोविड १९ रुग्णालयातिल शौचालय गेले घाणीच्या अधीन
भाईंदर– मीरा भाईंदरचे एकमेव सरकारी असलेले रुग्णालय हे कोविड-१९ ची साठी केले गेले त्यामुळे शहरातील नागरिकांचे हाल तर झालेच या कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना मनपाच्या गलथान पणामुळे रुग्णालयातिल शौचालयाची समस्या निर्माण झाली आहे. रुग्णालयात असलेले शौचालय हे घानीने घेरले आहे मनपा प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
कित्येक दिवस प्रतिक्षेत असलेले मिरा-भाईंदर मधले रुग्णालय एकदाचे सुरू झाले. तुटपुंज्या साधन सामुग्रीवर सुरू असलेले अनेक अडचणींना सामोरे जात या रुग्णालयाचा कारभार सुरू होता. त्यात कोविड-१९ साथ आली आणि मनपा शासनाने हे रुग्णालय कोविड साठी स्पेशल केले. भाईंदर पश्चिमेचे असलेले पंडित भीमसेन जोशी रुग्णालय (टेम्भा ) हे शासकीय रुग्णालय असून या रुग्णालयातील पहिल्या मजल्यावरील शौचालयाची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे रुग्णांचे अतिशय हाल होत आहेत. रुग्णांना दुर्गंधीचा,घाणीचा सामना करावा लागत आहे. मनपाचा आरोग्य विभाग हा नियोजनात कमी पडत असल्याने आणि हे रुग्णालय पालिका चालवू शकत नसल्याने ते शासनाच्या ताब्यात दिले आहे. परंतु सध्या देखरेख ही पालिका च करत आहे. पंडित भीमसेन जोशी हे रुग्णालय पालिकेने कोविड १९ रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. सध्या शहरात कोरोनावर उपचार करणारे शासकीय एकमेव रुग्णालय आहे. त्यामुळे या रुग्णालयावर मोठा ताण पडतो, रुग्णांची मोठी गर्दी होते. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना अनेक अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयामधील शौचालयाची सफाई होत नसल्याने शौचालयात दुर्गंधी पसरली आहे. कोविड-१९ रुग्णालय असलेल्या पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात पहिल्या मजल्यावर तीन शौचालय असून या शौचालयाची दुरावस्था झालेली आहे. शौचालयात घाण पाणी भरले आहे, तर दुसऱ्या शौचालयातही घाण आहे. यामुळे तेथे दुर्गंधी युक्त वास येत असतो. रुग्णांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या दुर्गंधी मुळे रुग्णांना आणखी दुसरे आजार बळावू शकतात. याकडे मनपा आरोग्य प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या प्रकारामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकामध्ये पालिका प्रशासनाविरोधात रुग्ण व संताप व्यक्त होत आहे.
ही शौचालये ताबडतोब साफ सफाई करून रुग्णांना होणारी गैरसोय दूर करण्यात येईल व पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची खबरदारी मनपा प्रशासन घेईल अशा दुर्लक्षित पणा होणार नाही असे आरोग्य विभागाचे उपायुक्त यांनी सांगितले.