कोरोना साथीच्या काळातही स्पा मध्ये सुरू होता अनैतिक कारभार
पोलिसांनी टाकला छापा
मीरारोड : कोरोनासाथीच्या महामारीने संपूर्ण विश्व हैराण झाले असतांना गैर द्यद्दे थांबण्याचे नावं घेत नाहित. मुंबईला लागून असलेले मीरा भाईंदर शहरात मिरा रोड पूर्व येथील काशिमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक व्यवसाय सुरू ठेवलेल्या स्पा वर पोलिसांनी छापा टाकून आरोपींना अटक करून बेड्या ठोकल्या आहेत.
एकीकडे सगळे जग कोरोनासी झुंज देत आहे तर दुसरीकडे मिरा-भाईंदर शहरातील बार, दारूची दुकाने, लॉजिंग, चोरीच्या छुप्या पद्धतीने सुरू ठेऊन अनैतिक व्यवसाय सुरु ठेवलेले आढळून येत आहेत. शहरामध्ये वाढत गेलेले मसाज च्या नावाखाली स्पा सेंटर हे अनैतिक धंद्याचें केंद्र बनत चालले आहे. डान्सबार, बार, लॉजिंग ने पहिलेच शहराची नाचकी करणारे ठरले आहेत त्यात आता मसाज पार्लर हे एक पोलिसांची डोकेदुःखी वाढवत आहेत.
काशिमीरा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मसाज पार्लरमध्ये अनैतिक धंदे वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. हे स्पा माफिया ना कायद्याला घाबरत आहेत, ना पोलिसांना घाबरत आहेत. स्पा माफियांची मनमानी आणि दादागिरी वाढल्याचे चित्र जाणवते आहे. कायद्याच्या चिंधड्या उडवत चोरीच्या मार्गाने मनाई आदेश धुडकवात अनैतिक कारोबार सुरू ठेवले आहेत. गुगल च्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने जाहिरात करून चोरीच्या मार्गाने हे गैर व्यवसाय सुरू केले आहेत.
अनेक मसाज पार्लर च्या नावावर चालणाऱ्या मसाज सेंटर ,स्पा मध्ये अश्लीलतेचा बाजारभरलेला असतो आणि अश्लील कृत्य करुन ग्राहकांना लुभावून अनैतिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.
शहरातल्या अनेक लॉजिंगचा वापर सर्रासपणे अनैतिक धंद्यासाठी केला जातो. हे शहर अनैतिक धंद्याचे शहर अशी ओळख निर्माण झाली आहे.
स्थानिक पोलिस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मंगळवारी सायंकाळच्या वेळी पावणे पाच च्या दरम्यान मिरारोड पूर्व येथील सुर्या शॉपिंग सेंटर च्या जवळ असलेल्या क्लस्टर-२ नामक इमारतीच्या गाळा नंबर-२१ दि लेवल २ स्पा नावाच्या मसाज पार्लरमध्ये चोरीच्या मार्गाने मनाई आदेश धुडकवात अनैतिक कारभार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी सदर गैरकृत्य करणाऱ्या ठिकाणी छापा मारून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
काशिमिरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय हजारे यांनी या प्रकारच्या गैरकृत्याकडे जातीने लक्ष देत ही कारवाई केली आहे या छाप्यात आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सदर स्पा मालक आणि तेथील कर्मचारी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलेस वेश्यागमनाकरिता प्रवृत्त करून तिला पुरुष ग्राहकास दाखवून वेश्यागमनाकरिता रक्कम ठरवून ती स्वीकारून हे गैरकृत्य करण्यासाठी स्पा सेंटर मधील रूम उपलब्ध करून दिली गेली असता हा छापा टाकला गेला आणि आरोपी दोन महिला सह एक पुरूष यांना अटक केली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी काशिमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून गुरनं कलम TT४६७/२०२० प्रमाणे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ सह भादवि कलम १८८,२६९,२७०,२७१ सह महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना २०२० चे नियम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय हजारे हे स्वतः करत आहेत.