विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाहणी दौऱ्यात सोशल डिस्टंसिंग चे वाजले तीन-तेरा
भाईंदर - महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे मिरा भाईंदर येथील रुग्णालय व आरोग्य व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला त्यावेळी कुठेही सोशल डिस्टन्स पाळन्यात आले नाही. सोशल डिस्टन्स चे धडे शिकवणारे नेतेच पालन करत नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. सत्ताधारी आणि मनपा प्रशासनाचे अधिकारी यांचे अर्थकारणाचे संबंध या शहरातल्या विकासाला खीळ घालत असल्याचे दिसत आहे. शहरात पार्टीचे नेते येणार असल्याची माहिती मिळताच शहरातील नेत्यांनी आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी गर्दी केली होती. प्रत्येकजण पुढे पुढे करतांना दिसून येत होता. त्यावेळी जनतेला सोशल डिस्टन्स पाळायला सांगणारे नेते मात्र सोशल डिस्टन्स पाळताना दिसून आले नाही. विधानसभा विरोधी पक्षनेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते हे दोघेही पाहणी करण्यासाठी एकत्र शहरात आले होते. त्यांनी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाची पाहणी करून पालिका मुख्यालयात आयुक्त व अधिकारी यांच्याशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की महापालिकेला राज्य सरकारने जास्तीत जास्त अनुदान द्यावे, तसेच खासगी रुग्णालयाच्या बिलाची तातडीने चौकशी करण्यासाठी समिती गठीत करून बिले नियंत्रणात येतील याची दक्षता घ्यावी. तसेच पालिका व महाराष्ट्र शासनात संवाद समन्वय होत नाही. पालिका व शासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय झाल्यास चांगली कामे होण्यास मदत होईल. तसेच रुग्णालयात रुग्णांना योग्य सोई सुविधा व उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच कोविड सेंटरमध्ये जेवण व सुविधा मिळत नसल्याच्याही तक्रारी आहेत, त्याकडे आयुक्तांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
तसेच दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात एका वृद्ध व्यक्तीला उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाला हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. सर्वांना वेळेवर उपचार मिळाले पाहिजेत व पत्रकारांना सुद्धा वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. असे प्रकार घडू नयेत यासाठी पालिका आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पण सत्ता त्यांच्याच पक्षाची असतांना सत्ताधारी काय करत आहेत. शहरात घडणाऱ्या समस्या सोडवण्यात सत्ताधारी फेल झाले आहेत का? सत्ताधाऱ्यांना नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ नाही की रस नाही असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत. आपल्या पक्षाची सत्ता असलेल्या मनपा अपयशाचे खापर राज्य सरकारवर फोडून मोकळे होणार का ? केंद्र सरकारने या संकटाच्या काळात राज्यसरकाराना हवी तेवढी मदत केली नाही केंद्र सरकारचे नियोजन शून्य धोरण आहे. त्याच धर्तीवर मीरा भाईंदर मनपाचा कारभार सुरू आहे. सत्ताधाऱ्यांना परिस्थितीचे भान नाही. खाली आरोप करून मोकळे होणे आणि आश्वासन देणे वेळ मारून नेणे हे भाजपचे काम आता पर्यंत राहिले आहे अशा भाजपा विरोधकांकडून भावना व्यक्त करण्यात येत आहेत.
या पाहणी दौऱ्याच्या वेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मिरा भाईंदर संपर्क प्रमुख रवींद्र चव्हाण , महापौर ज्योस्ना हसनाळे व जिल्हा अध्यक्ष हेमंत म्हात्रे अनेक नगरसेवक , कार्यकर्ते उपस्थित होते.