आर. सी. एफ. पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी इंधन चोरांच्या आवळल्या मुसक्या 

आर. सी. एफ. पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी इंधन चोरांच्या आवळल्या मुसक्या 



मुबंईच्या चेंबुर च्या भागत असलेल्या आर सी एफ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एच पी सी एल कंपनीच्या परिसरात इंधन(तेल) ची चोरी होत होती सदर चोरीच्या घटनेची गुप्तमाहिती पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सदर प्रकारा बाबत वरिष्ठांना कळवले आणि पोलिस पथक तयार करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शहानिशा करून सदर प्रकार घडत असल्याचे दिसून आल्यानंतर या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून आरोपिणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


 


मुबंई हे एक झपाट्याने बदलणारे शहर आहे. या शहरात नानातऱ्हाचे लोक राहतात. आपले जीवनमान बदलण्याचे स्वप्न उराशी बाळगून वेगवेगळ्या भागातून लोक मुबंईला येतात कमी वेळात जास्त पैसा कसा मिळेल यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने मार्ग शोधत असतो. यात चोरी करणारे चोर ही मागे राहिले नाहीत या बदलत्या शहरात चोरीचे मार्ग ही बदलले दिसत आहे. चोर वेगवेगळी शक्कल लढवून चोरी करण्याचे मार्ग शोधत आहेत. प्रत्येक कामात घपला करून काळीकमाई करणारी मंडळी या शहरात काळी कमाई करतांना पाहयेला मिळतात.


शेवटी वाईट कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते एक दिवस बाहेर येतच असते. गुन्हेगार कितीही चालाख असला तरी तो गुन्हा करून काहीतरी पुरावा पाठी ठेवतोच असाच प्रकार मुंबईतील चेंबुर च्या आर सी एफ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडत होता एच पी सी एल कंपनी च्या परिसरात बीपीसीएल कंपनी च्या भिंतीलगत असलेले एक टँकर पार्किंग जवळ इंजिनियरिंग वर्कशॉप च्या पाठीमागे जेव्हां गव्हनपाडा बी डी पाटील मार्ग चेंबूर मुंबई ७४ याठिकाणी इंधन चोरी करण्याच्या उद्देशाने त्याठिकाणी काही चोरट्यांनी लोखंडी पाईपच्या साह्याने पॉईंट काढून त्या ठिकाणाहून इंधन (तेल) चोरी करून बक्कळ पैसा कमवण्याचा फंडा राबवला होता. या चोरीचा प्रकाराची माहिती गुप्त बातमीदार यांच्या मदतीने पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांना मिळाली तेव्हा त्यांनी या चोरीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी एक पथक नियुक्त करून स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या मदतीने सदर घडत असलेल्या प्रकाराचा भांडाफोड केला. आणि तात्काळ वरिष्ठांना सदर घटनेची माहिती कळवून एच पी सी एल कंपनी चे लेफ्टन कर्नल एस.एन. लिमकर (चिफ मॅनेजर सेक्युरिटी) व विक्रम रूपचंद साखरे (चिफ मॅनेजर एच. पी. सी. एल. कंपनी) यांना घटनास्थळी बोलावून माहिती घेतली असता एच. पी. सी. एल. कंपनीच्या बी-१,सी-२,सी-३ पाईप असून त्यामधील सी-२ ही पाईपलाईन सुरू असून त्यातून डिझेल हे इंधन सप्लाय होतं आहे असे सांगितले. सदर ठिकाणी मजुरांच्या माध्यमातून खोदकाम करून सदर चा पॉईंट बंद करण्यात आला आणि या घडत असलेल्या गुन्ह्याची तक्रार साखरे यांच्या तक्रारी वरून घेण्यात आली असून गुन्हा नोंदनी क्र.२०३/२०२० कलम ३७९,२८५ भारतीय दंड संहिता सह पेट्रोलियम व मिनरल पाईपलाईन अँक्ट कलम १५ (२) (३) (४) सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम-३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत या गुन्ह्यातील दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपी किशोर विश्वनाथ शिरसोंदे वय वर्षे ३६, मोहम्मद इरफान मोहम्मद हुसेन पठाण उर्फ राजू वय वर्ष २४,या दोन आरोपींना पोलिसांनी अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र सोनावणे व सपोनि कदम यांनी केला असून काही आरोपी गजाआड केले आहेत तर पुढील तपास सुरू आहे