नकली आवाजात क्लिप बनवून आमदाराच्या नावाने व्हायरल करणारी महिला भाजपाची पदाधिकारी


 


 


काहीदीवसापूर्वी समाजमध्यातून मोठ्याप्रमाणात आमदार गीता जैन यांच्या नावाने एक अडिओ क्लिप व्हायरल होत होती . त्या संदर्भात गीता जैन १७ जुलै ला भाईंदर पूर्व येथील नवघर पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती पोलिसांनी तपास करून या अडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता ही अडिओ क्लिप व्हायरल करणारी भाजपा पक्षाची महिला पदाधिकारी निघाली आहे अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.


 


मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्या घरीच कोरणटाईन झाल्या होत्या त्याच काळात त्यांच्या नकली आवाजाची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर व्हायरल झाली होती. या संदर्भात आमदार गीता जैन यांना हा प्रकार समजताच त्यांनी या क्लिप बाबत खुलासा ही केला आणि त्यांनी या संदर्भात आपल्या स्वीय सहाय्यकांच्या मदतीने नवघर पोलिस ठाण्यात १७ जुलै ला नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गीता जैन यांनी तो माझा आवाज नसल्याचे स्पष्ट केले व हा प्रकार निंदनीय आहे ज्याने कोणी हा प्रकार घडवून आणला आहे त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरनाचा पोलिसांनी तपास सुरू करून या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली.


 


समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये गीता जैन यांच्या आवाजासारखा मिळता जुळता आवाज काढून कोरोना संदर्भात माहिती दिली आहे. त्यात 'केंद्रसरकार कडून प्रत्येक कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी नगरपालिका आणि महानगरपालिकेला दीड लाख रुपये देण्यात येत आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टर, प्रयोगशाळा, आरोग्य विभाग पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कशी वाढेल यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्दी, ताप आलातरी त्या व्यक्तीला कोरोना बाधित दाखवून रुग्णांची संख्या वाढवली जात आहे. दीड लाख रुपये त्यांना मिळाले की, त्या रुग्णाला सुट्टी दिली जाते. कोरोनाच्या नावाखाली मोठा भ्रष्ट्राचार सुरू आहे, तरी जनतेने कोविड तपासणी करू नये आणि संख्या वाढवू' असे आवाहन त्या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आले . आमदार गीता जैन यांचा नकली आवाज काढून जैन यांचे नाव आणि फोटो टाकून याचा एक व्हिडिओ तयार करून तो समाजमाध्यमावर व्हायरल करण्यात आला होता. या नकली आवाजाचा ऑडिओ व्हायरलप्रकरणी पोलिसांनी भाजपची महिला पदाधिकारी हिस शुक्रवारी अटक करून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले गेले या प्रकरणी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ऑडिओ क्लिप प्रकरणी अटक करण्यात आलेली ही महिला भा.ज.पा. च्या उत्तर भारतीय महिला मोर्चाची पदाधिकारी आहे. या महिलेने त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही आणि, मी हा ऑडिओ बनवला नाही असे या महिला पदाधिकाऱ्याचे म्हणणे आहे अशी माहिती मिळत आहे.या प्रकरणाचा अधिक तपास नवघर पोलीस करत आहेत.