रुग्णास उपचारासाठी घेऊन जाण्यास मज्जाव करणाऱ्या उत्तनच्या ३० जणांविरोधात गुन्हा दाखल

रुग्णास उपचारासाठी घेऊन जाण्यास मज्जाव करणाऱ्या उत्तनच्या ३० जणांविरोधात गुन्हा दाखल


 


भाईंदर:-सध्या शहरात कोरोना साथीचा धुमाकूळ वाढला आहे. दररोज वाढणारी रुग्णसंख्या ही चिंतेची बाब बनली आहे. त्यातच भाईंदरच्या उत्तन रहिवासी यांनी मात्र अजब प्रकार घडवला आहे. स्थानिक रहिवाशांमधिल तीन जणांना करोनाची लागणं झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी गेले असता त्यांना स्थानिक नागरिकांच्या २५ ते ३० जणांच्या जमावाने रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाण्यास विरोध केला. या प्रकरणी उत्तन सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 


मिरा-भाईंदर मनपा हद्दीतील उत्तण परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांना कोरोनाच्या विषाणूची लागण झाली होती त्यामुळे मनपाचे काही कर्मचारी त्या रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन येण्यासाठी गेले असता स्थानिक काही रहिवाशी यांच्यातिल सुरवातीला २५ ते ३० जणांच्या जमावाने यास विरोध केला व पुढे जमाव वाढतच जात होता. मनपातील वैद्यकीय कर्मचार्यांचा अहवाल चुकीचा असून खोटी माहिती असल्याचे सांगत वाद घालण्यास सुरवात केली. रुग्णांना घेऊन येण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विनंती करून देखील जमाव ऐकत नव्हता त्यांचा विरोध सुरूच होता परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना सदर परिस्थिती बाबत माहिती देण्यात आली . पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला समजवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचे म्हणणे ही जमाव ऐकत नव्हता आणि या जमावाचा विरोध सुरूच होता त्यामुळे विरोध करणाऱ्या विरुद्ध उत्तन पोलिसांनी जमाव भडकवल्या प्रकरणी ब्राईन कासुगर व रिपन गर्हा यांच्यासह ३० जणांविरोधात कलम १४३,१८८,२६९,२७०,२७१ नुसार उत्तन सागरी पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 


उत्तन सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी लोकांना विनंती केली आहे की समाज माध्यमावर पसरणाऱ्या अफवा वर नागरिकांनी विश्वास ठेवू नये कोणतीही बाब पडताळून घेण्यासाठी व अस काही वाटल्यास पोलिस ठाण्यात अथवा पालिकेच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधावा जेणेकरून अफवांवर विश्वास ठेवून चुकीची माहिती नागरिकां पर्यंत पोहचनार नाही.