मिरा-भाईंदर शहराची स्थिती बनत चालली अधिक गंभीर
- कोरोना रुग्णांचा आकडा गेला सव्वा चार हजारा वर
- मृत्यूचा आकडा गेला दीडशे पार
शहरावर कोरोनचे संकट कमी होण्याऐवजी दररोज वाढताना दिसत आहे. आता पर्यंत मिळणाऱ्या रुग्णांच्या संख्येचा आज रेकॉर्ड मोडीत काढला आहे. मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता आज दिवसभरात ३०३ नवीन रूग्ण मिळून आले आहेत. कोरोनाचे रुग्ण मिळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या छोट्याशा मनपा क्षेत्रात कोरोनाबाधितांच्या संख्येने चार हजाराचा आकडा पार करत आजच्या मिळालेल्या माहितीनुसार 4314 पल्ला गाठला आहे. उपचार घेऊन ठीक होणारी संख्या ही चांगली आहे. तर मृत्यू चा आकडा ही दीडशे पार केला आहे.
मीरा भाईंदर शहराची कोविड१९ साथीने धुमाकूळ घातला आहे. रुग्णांची दररोज झपाट्याने वाढ होत आहे. संसर्ग अधिक वेगाने पसरत आहे त्यामुळे प्रशासना वरचा ताण कमी होण्याचे नाव घेत नाही. शहरातील बऱ्याच जाणकारांचे मत मात्र वेगळे बनत आहे . कोरोनाच्या साथीचा फायदा इथले भ्रष्ट्राचारि अधिकारी जास्त उचलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शहरात वेगवेगळ्या चर्चा रंगताना ऐकायला मिळत आहेत अडकलेले मजूर, कामगार यांच्या खिचडी, भोजन वाटपात मोठी लूट झाल्याची चर्चा शहरभर रंगली होती तशीच चर्चा आता कोरोन टाईन करण्यावर सुरू होत आहे काही जणांना असे वाटत आहे की ज्यांच्याकडे घरी कोरनटाईन होण्याची चांगली सुविधा उपलब्ध असतांना त्यांच्यावर जबरदस्ती करून कोरनटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. यावरती प्रशासनाने लक्ष वेधले जाणे तितकेच गरजेचे आहे असे अनेकांना वाटते आहे तर या पाठीमागे नेमके काय राज आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ हजार ३१४ झाली आहे. ३०७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.तर आता पर्यंत १६२ जणांनी आपले प्राण गमवले आहेत.
आज रवीवारच्या आलेल्या आकडेवारी नुसार ३०३ रुग्णांचा अहवाल हा संक्रमित आला आहे. रुग्णालयात उपचारा दरम्यान ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२५ आहे व सध्या शहरात १०८१ रुग्ण उपचार घेत आहेत.
आज शहरात अश्या प्रकारे विभागवार रुग्ण मिळून आले आहेत मिरारोड पूर्व भागात १७४, भाईंदर पूर्व ६६ मध्ये तर भाईंदर पश्चिम ६३ रुग्ण आढळून आले आहेत.रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे १० जुलै पर्यंत शहरात कडक लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. तरी ही आज समोर आलेल्या आकडेवारी ही आतापर्यंत चा रेकॉर्ड तोडणारी ठरली आहे त्यामुळे मीरा भाईंदरच्या नागरिकांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे.