मिरा- भाईंदर मधला कोरोना नियंत्रणात येणार कधी ?

मिरा- भाईंदर मधला कोरोना नियंत्रणात येणार कधी ? 



मुंबईला लागूनच असलेलंमीरा भाईंदर शहर हे कोरोनाच्या सावटाखाली गेले आहे. दररोज कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. आजच्या स्थितीत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या साडेपाच हजार पार गेलेली आहे. मुंबईत अपेक्षित नसलेल्या ठिकानी कोरोनावर नियंत्रण आणले जाते मग या छोट्याशा मनपा क्षेत्रात कोरोना नियंत्रणात येणार कधी हा प्रश्न शहर वाशियाना पडला आहे.


मुंबई मधले अनेक विभाग आहेत जिथे कोरोना वाढीचा वेग झपाट्याने वाढत होता ते ठिकाणे आता नियंत्रणात येत आहेत. पण मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मात्र मार्च महिन्यापासून लॉकडाउन सुरू आहे तरीही या शहरातला कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यात यश आले नाही. धारावी सारखी दाटीवाटीची वस्ती आहे. त्याच बरोबर उपनगरात असलेल्या झोपडपट्टी विभागात कोरोना नियंत्रणात येत आहे पण मीरा भाईंदरमध्ये मात्र तो नियंत्रणात येत नाही उलट दिवसेदिवस वाढत आहे. या मागची नेमकी कारणे काय ? या प्रश्नाचे उत्तर मनपा कधी देण्याचा प्रयत्न ही करणार नाही जवळपास चार महिन्याचा लॉकडाऊन या शहराने भोगला आहे. या शहरातली जनता गेल्या चार महिन्यापासून लॉकडाऊनखाली जगत आहे. सर्वसामान्य माणूस आर्थिक परिस्थितीने कोलमडला आहे.जगायचे कसे, खायचे काय, घर चालवायचे कसे असे प्रश्न त्याच्या समोर उभे राहिले आहेत.


अशा गंभीर परस्थित शहरात रुग्ण कमी करण्यात मनपा अपयशी ठरत आहे असेच शहरातील नागरिकांना वाटत  आतापर्यंत मिरा भाईंदर शहरात ४,११३ जणांनी कोरोनावर मात केली असून एकूण मृत्यूची संख्या १९१ वर पोचली आहे. मीरा भाईंदर कोरोनाबधितांची एकूण ५,५६८ संख्या झाली असून, ११८१ रुग्णांचा कोविड चाचणीचे अहवाल प्रतीक्षेत आहे. तर १२६४ जणांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अठरा जुलैपर्यंत शहरात कडक लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. जर रुग्ण संख्येत घट नाही झाली तर पुन्हा १८ नंतरही या लॉकडाऊन मध्येच राहावे लागेल की काय या विचाराने अनेक जण चिंतेत आहेत. अशाच लॉकडाऊन ठेऊन रुग्ण संख्येत वाढ होत असेल तर या लॉकडाउनचा काय फायदा अशाही भावना अनेकजण व्यक्त करत आहेत. राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी मात्र यावरती कोणतीही भूमिका घेताना दिसत नाहीत अगदी शांत आहेत. त्यामुळे शहरातील जनतेतून एकच प्रश्न विचारला जात आहे की, मिरा-भाईंदर मधला कोरोना नियंत्रणात येणार कधी ? याचे उत्तर कोण देणार सत्ताधारी, जनतेचे लोकप्रतिनिधी, की मनपा प्रशासन या पैकी कोण पुढे येऊन देणार हे मात्र पहावे लागणार आहे.