भारतात कोरोना पेक्षा जास्त, हाताचे काम गेल्यामुळे लोक मरतील, देशात राज्यात उपासमारी निर्माण होणारी परिस्थिती - प्रकाश आंबेडकर

भारतात कोरोना पेक्षा जास्त, हाताचे काम गेल्यामुळे लोक मरतील, देशात राज्यात उपासमारी निर्माण होणारी परिस्थिती - प्रकाश आंबेडकर


 


लॉकडाऊन नाही तर रोजगार वाढवा - 


 


पुणे, - वंचित बहुजन आघाडी चे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरोनामुळे होणारा मृत्यू दरावर नियंत्रण ठेवू या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला उद्धव ठाकरे यांनी स्वतःला खुदा समजू नये व तशा भाव ही दाखवूनये अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


 


कोरोना विषाणूचा संसर्ग जरी जगात वाढला असला तरीही भारतात याचा जास्त परिणाम जाणवणार नाही कारण भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. असे पूर्वीच ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांना जास्त काही होणार नाही, भारतातले नागरिक कोरोनाने नाही तर हाताला नसल्याने, हातचे काम गेल्याने, रोजगार बुडाल्याने मरतील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवू जनतेला वेठीस धरू नये,अस ही मागणी ही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.


                  


  भारता संदर्भात अमेरिकेच्या हाफकीन संस्थेने म्हटले होते की, भारतात 40 टक्के लोकांना कोरोनाची लागण होईल पण एकाच आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, भारतात कोरोना पसरणार नाही. भारतातील नागरिकांची प्रतिकारशक्ती चांगली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे म्हणणे खरे ठरले असल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.


 


 बुद्धाच्या एक सत्य वचनाची आठवण ही त्यांनी करून दिली, जो प्राणी, माणूस जन्माला आला तर त्याला मृत्यू हा निश्चित आहे, त्यामुळे सरकारने ढासळलेली,खिळखिळी झालेली देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या काम योग्य नियोजनाने करावे तरच लोक जगतील अन्यथा त्यांच्यावर उपासमारीने मरण्याची वेळ येऊ शकते. अशी देशात आणि राज्यात परिस्थिती बनत चालली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की आपण लॉकडाऊन वाढवण्यावर भर न देता कामधंदे वाढवण्यावर भर देणे गरजेचे आहे. नाहक 


लॉकडाऊन जनतेला वेठीस धरू नका. असेही शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणाले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांच्याकडून मिळत आहे.