भाईंदरच्या आमदार कोरोना संक्रमित असतांनाही सहकाऱ्या सोबत केला वाढदिवस साजरा
भाईंदर : मिरा-भाईंदर च्या आमदार गीता जैन यानां कोविड १९ चे संक्रमण झालेले असतांनाही त्यानीं आपला वाढदिवस साजरा केला त्याचे फोटो समाज माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
मिरा-भाईंदर च्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या आमदार गीता जैन यांना कोविड १९ चा संसर्ग संक्रमित आढळून आल्यामुळे त्यांना त्यांच्या बंगल्यात त्यामुळे त्यांच्या क्वारंटाइनचे आदेश असतानाही आमदार गीता जैन यांनी आपला वाढदिवस आपल्या पती व सहकाऱ्या सोबत साजरा केला आणि त्या साजरा केलेल्या वाढदिवसाचे फोटो समाज माध्यमातून प्रसारित करताच समाज माध्यमातून त्यांच्यावर भाजपच्या नेत्याबरोबरच कार्यकर्ते ही टीका करतांना दिसून येत होते त्याच बरोबर सुज्ञ नागरिकांनी असा गैरजीमेदार वर्तूणुकीमुळे नाराजगी व्यक्त केली आहे. एका प्रतिष्ठित, आणि जाणकार व जीमेदार व्यक्ती कडून असे या काळात वर्तन केले जाणे म्हणजे या शहराचे दुर्दैव आहे अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत. वाढदिवस साजरा केला जात असताना त्यावेळी काही सहकारी त्या ठिकाणी उपस्थित होते हे वायरल झालेल्या फोटो वरून सिद्ध होत आहे.
मिरा भाईंदर शहरातील अपक्ष आमदार गीता जैन यांचा १ जुलै रोजी करोना अहवाल पॉझिटिव्ह आला त्यानंतर त्यांचे पती सह दोन नातलग आणि बंगल्यात काम करणारे तीन कर्मचारी असे साथ जणांना कोरोनाची लागण झाली आहे या सर्वांना गीता जैन यांच्या बंगल्यातच अलगिकरंन करून ठेवले आहे त्यामुळे आमदार आणि त्यांचे परिवार सहकारी यांना एक न्याय आणि इतर नागरिकांना वेगळा न्याय हे दुपट्टी भूमिका सरकार आणि सत्ताधारी का करत आहेत असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. नगरसेवक आणि मेहता समर्थक धुर्वकिशोर पाटील हे म्हणाले की सामान्य रुग्णांना त्यांच्याकडे अलगिकरनासाठी जागा असतांनाही पालिका प्रशासन बळजबरीने त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये या अलगिकरण कक्षात घेऊन जाते तर मग आमदारांना वेगळा न्याय का अशा प्रश्न उपस्थित केला आहे. याची तक्रार आयुक्त यांच्याकडे केली आहे असे म्हटले आहे. मेहता समर्थकानी मात्र संधी सोडलेली दिसत नाही. गीता समर्थकानीं मात्र मौन बाळगलेले दिसून आले आहे. १० दिवसांकरिता होम क्वारंटाइनचे निर्देश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत ५ जुलै रोजी गीता जैन यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्यासोबत त्याचे करोना पॉझिटिव्ह पती आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
करोना पॉझिटिव्ह असताना आणि क्वारंटाइनचे आदेश असतानाही आमदार गीता जैन यांनी अशा प्रकारे कुटुंबियांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.