मिरा-भाईंदरकरांसाठीआमदार प्रताप सरनाईक यांनी 'ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर' यंत्राची उपलब्ध केली सुविधा

मिरा-भाईंदरकरांसाठीआमदार प्रताप सरनाईक यांनी 'ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर' यंत्राची उपलब्ध केली सुविधा


 


*आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना* 


 


ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे शहराचा भाग व संपूर्ण मीरा भाईंदर शहरात


 


प्रताप सरनाईक यांच्याकडून 'आरोग्य उत्सवा'ला सुरुवात


 



मिरारोड : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या वाढदिवसानिमित्त शहरात 'आरोग्य उत्सवा'ला सुरुवातकरण्यात आली आहे अशी माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.


 


मिरा-भाईंदर शहरात कोरोनाचे संकट वाढत आहे यामुळे अनेक रुग्ण दगावले आहेत. या मतृ झालेल्या बऱ्याच रुगणानां वेळीच ऑक्सिजन उपलब्ध करून देता आला नाही. शहरात खाजगी रुगणालाये अवाढव्य बिल आकारत आहेत त्यामध्ये जनतेची वारेमाप लूट केली जात आहे. मनपातील काही अधिकारी आणि खासगी हॉस्पिटल यांच्यात साटेलोटे सुरू आहे त्यामुळे ही लूट मोठ्या प्रमाणात होत आहे ही बाब खूप गंभीर आहे असा आरोप ही सरनाईक यांनी लावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सरनाईक यांच्या संकल्पनेतून आज २७ जुलै २०२०पासून ओवळा-माजीवडा मतदारसंघात आणि संपूर्ण मिरा-भाईंदर शहरात 'आरोग्य उत्सवा'ला सुरुवात करण्यात आली आहे. या मध्ये शिवसेनेच्या ६० शाखांमधून वेगवेगळ्या आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांसाठी प्राथमिक औषधे वाटप करण्यासह कोरोना रुग्णांना सर्वात उपयोगी ठरणाऱ्या 'ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर' हे यंत्र ऑक्सिजन ची गरज भासणाऱ्या कोणत्याही रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही यंत्रे शिवसेनेच्या शाखामध्ये आजपासून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत , अशी माहिती सरनाईक यांनी दिली. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे शहराचा भाग व संपूर्ण मीरा भाईंदर शहरात हा उपक्रम राबवला जाणार आहे.


कोरोनाच्या संकटात नागरिकांना व गरजुंना सहकार्य करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या मतदारसंघात, व मिरा-भाईंदर शहरात अनेक उपक्रम राबवले आहेत. स्थलांतरीत कामगारांना मोफत जेवण, 'शाखा तिथे दवाखाना', मोफत जंतुनाशक फवारणी असे उपक्रम राबविले नागरिकांना निरोगी ठेवण्यासाठी लाखो गोळ्या वाटप , रक्तदान शिबिरे , आरोग्य शिबिरे झाली आहेत. आता मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'आरोग्य उत्सव २०२०' सुरु केलाआहे , प्रत्येक रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ऑक्सिजन - प्लस मीटरने आधी तपासले जाईल. 'ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर' हे यंत्र शिवसेना शाखांत उपल्बध असणार आहेत. या यंत्राचा वापर कसा करायचा हे शाखेत असणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले आहे. 'कोरोना' जो पर्यंत संपणार नाही तोपर्यंत या आरोग्य सेवा शिवसेनेच्या शाखामधून उपलब्ध होणार आहोत. प्राथमिक सुविधा देताना रुग्णांना जी प्राथमिक उपचार म्हणून औषधे लागतात तीही मोफत वाटप करण्यात येणार आहे. असे सरनाईक यांनी सांगितले. 


 


 कोरोना किंवा इतर बऱ्याच रुग्णांना व अचानक शरीरातील ऑक्सिजन कमी होते त्यावेळी त्या रुग्णाला धोका निर्माण होत असतो त्यासाठी हे 'ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर' यंत्र अत्यंत महत्वाचे काम करेल त्या रुग्णाचा जीव वाचू शकतो. त्यामुळे नागरिकांना ही 'ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर' यंत्राची सुविधा उपलब्ध करून देत आहोत. एखाद्या रुग्णाला नेण्यासाठी रुग्णवाहिका येईपर्यंत तसेच त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत या यंत्राचा वापर केला जाऊ शकतो 


 


या महामारीच्या काळात साजरे केले जाणारे दहीहंडी उत्सव गणेशोत्सव, नवरात्रउत्सव तसेच गणेशोत्सव , नवरात्रउत्सव एकदम साध्यापद्धतीने साजरे करून असे पुढील सगळेच उत्सव एकदम साधारण पद्धतीने साजरे केले जाणार आहेत. त्याऐवजी 'आरोग्य उत्सव' अंतर्गत आरोग्य विषयक विविध उपक्रम माझ्या मतदारसंघात व मिरा-भाईंदर शहरात राबवत आहोत, असे सरनाईक म्हणाले.