राजगृहावर केलेल्या हल्ल्याचा अनेक राजकीय नेत्यांनी नोंदवला निषेध 


 



  • तरुणाईत मात्र तिव्र व्यक्त होतंय संताप 

  • समाजमध्यातून आक्रमक प्रतिक्रिया

  • पोलिसांनी तात्काळ कारवाईचे दिले आदेश,पोलिस माथेफिरुच्या मागावर


 


आधुनिक भारताचे भाग्यविधाते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांच्या विद्वत्ते पुढे  संपूर्ण विश्व नमन होतं जगात असा तो एकमेव महामानव आहे ज्याने फक्त पुस्तकासाठी एक घर उभा केल. कोट्यवधी भारतीयांच्या उत्क्रांतीची ज्यांनी निब पेरली आणि करोडो भारतीयांनी आपली प्रगती केली ते कोट्यवधी जीवाचे ताईतमणी महामानव, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच घरावर्ती काही माथेफिरुनी निशाणा केला आहे. या ऐतिहासिक वास्तूचे मुस्कान करणार्‍या माते पूर्ववर्ती पोलीस कारवाई करतीलच पण या घटनेने संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे देशातल्या समाजमाध्यम आवर्ती ही बाब मोठ्या झपाट्याने वाढ होत आहे सर्वत्र असंतोष आणि तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत कोट्यवधींच्या भावना या वास्तूशी जुळलेले आहेत त्याच वास्तू वरती हल्ला करण्याचे धाडस षड्यंत्र काही मनुवादी वृत्तीचा बुद्धीने असले की काय अशी शंका येऊ लागली आहे या घटनेचा सगळ्याच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे ही घटना तारीख सात रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली जगप्रसिद्ध असलेल्या राजगृह वरच्या लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची त्याचबरोबर या परिसरात असलेल्या पुलंची तोडफोड यामागचे पूर्ण केल्यामुळे देशभर एकच कल्लोळ माजला आहे आणि अनेक नेत्यांनी या घटनेचा समाज माध्यमातून जाहीर निषेध नोंदविला पाहायला मिळतो आहे राजगृहावर उपस्थित असलेले परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय भीमराव आंबेडकर यांनी समाज माध्यमातून आंबेडकरी अनुयायी अनुयायांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते आणि कोट्यावधी जनतेचे स्फूर्तीस्थान आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा सर्व आंबेडकरी विचारांच्या बांधवांना सय्यम आणि शांती राखण्याचे अहवाल केले आहे कुठलाही प्रकाराला बळी पडू नये कुठलाही गोंधळ होऊ नये सर्वांनी शांतता आणि संयम ठेवावा असे आवाहन केले आहे आणि घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवला आहे त्याचबरोबर अनेक राजकीय नेत्यांनीही ट्विटरद्वारे या घटनेचा निषेध नोंदवला पाहायला मिळतो आहे त्यामधील काही मोजक्या प्रतिक्रिया वाचकांसाठी याठिकाणी देत आहोत


 


 महामानवाच्या या पवित्र वस्तूचे ज्या माथेफिरू ने नुकसान केले हे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व मानसिकतेचा निषेध." असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध नोंदवला आहे.


 


 


"दादर येथील राजगृह या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी जो हल्ला केला तो निषेधार्ह आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु आहे. दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल" असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.


 


विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. "विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरजी यांचे मुंबई निवासस्थान असलेल्या राजगृह या ठिकाणी अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. मी सदर घटनेचा निषेध करतो" असं पटोले यांनी म्हटलं आहे.


 


 


धनंजय मुंडे यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह हे निवासस्थान ही आमची अस्मिता आहे. हा हल्ला आमच्या अस्मितेवरचा हल्ला आहे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे आणि कडक कारवाई ची मागणी केली आहे


 


 


 


तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट द्वारे तीव्र शब्दात या घटनेचा निंदा करत निषेध नोंदवला आहे. "परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली आहे. राजगृह अनेकांचे प्रेरणास्थान आहे, नागरिकांच्या भावना राजगृहाशी जोडलेल्या आहेत. या कृत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध." असं जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


 


 


वंचित बहुजन आघाडी चे प्रमुख नेते व राष्ट्रीय अध्यक्ष आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकरांनी केलं राज्यातील आणि देशातील फुले शाहू आंबेडकर विचार धारेच्या समुदायाला शांततेचं आवाहन केले आहे. समाज माध्यमातून एक व्हिडिओ वायरल केला आहे.


 


"मी सगळ्यांना व्हिडीओद्वारे आवाहन करतो आहे की सगळ्या आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी, ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातलं. पोलिसांनी त्यांचं कर्तव्य केलं. राजगृहाच्या आजूबाजूला आंबेडकरवाद्यांनी जमू नये, पोलीस त्यांचं काम करत आहेत. आपण सगळ्यांनी शांतता राखावी" असं आवाहन केलं आहे.


 


 


ही घटना जेवढी निदा करावी तेवढी कमी आहे. राज्यात वाढते आंबेडकरि समुदायावर वाढते हल्ले दररोज वाढत असतांनाच हा जातिवाद्यांनी राजगृहावरच हल्ला चढवण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी शंका येत आहे. राज्यातील तरुणाई मध्ये तीव्र आणि उग्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या राज्यात या दंगलखोराणा या समुदायाला जाणीवपूर्वक भडकावून दंगल तर माजवायची नाही ना ही भावना जमाजात व्यक्त होत आहे. या घटनेचे वृत्त समजताच आंबेडकर अनुयायी राजगृहावर जमा होऊ लागले पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपास सुरू केला आहे . हे दंलखोर राजगृहाच्या सीसी टीव्ही च्या कॅमेऱ्यात कैद झालेले असतीलच पण या घटनेमागे कोण आहे याचा तपास आता पोलीस घेत आहेत.