रिपब्लिकन सेने च्या वतीने राजगृहावरच्या हल्ल्याचा नोंदवला निषेध
हजारो वर्षे अन्याय, गुलामी सहन करत जगणाऱ्यांच्या गुलामीच्या बेड्या तोडून माणूस म्हणून जगण्याची उमीद उभी करणारे तमाम मानवजातीचे प्रेरणास्तोत्र विश्वरत्न परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले राजगृहावर माथेफिरुनी अचानक हल्ला करून राजगृहाच्या दिशेने दगडफेक करून , परिसरात असलेल्या सामानाची तोडफोड केली गेली , सीसीटीव्ही कॅमेरे व तिथे असलेल्या झाडांच्या कुंड्या तोडण्यात आल्या. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील अनेक विदवान, फुले, शाहू,आंबेडकर विचारांना मानणारा वर्ग या पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी सतत येत असतो, विजयादशमी, जयंती, महापरिनिर्वाण दिनी तर लाखोंचा सागर जमा होतो. तमाम भारतीयांसाठी हे अतिशय महत्वाचे स्थान आहे.
या ऐतिहासिक वास्तू वर काल संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केला. यात या ऐतिहासिक वतस्तूचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला गेला . कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत या महाराष्ट्रात दंगली घडवून आणण्यासाठी असे कृत्य केले जात आहेत सध्या देशात महामारीची साथ सुरू आहे. हे जाणीवपूर्वक घडवलेले षडयंत्र तर नाही ना अशी शंका ही उपस्थित केली जात आहे. या घटनेचा रिपब्लिकन सेनेच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला असून परभणी येथील जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले .या वेळी निवेदन देतांना लोकनेते विजय वाकोडे राज्य उपाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी रिपब्लिकन सेना जिल्हा अध्यक्ष परभणी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळा कडून परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना निवेदन दिले गेले यावेळी रिपब्लिकन सेनेचे मा.आशिष वाकोडे युवा जिल्हाध्यक्ष परभणी मा चंद्रमणी लोखंडे शहराध्यक्ष पूर्णा रवी खंदारे,खमर फुलारी,
मा प्रशांत तळेगावकर,रवी तूपसमिंद्रे,अमोल दाडगे,आकाश काकडे,राजू ढाकरके,आकाश खंदारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते....
राजकुमार सूर्यवंशी यांच्याकडून आरोपींना तातडीने शोध घेऊन अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच कारवाई न झाल्यास पुन्हा संपूर्ण जिह्यात आणि महाराष्ट्रात संघटने कडून तीव्र आंदोलन करू असा इशारा सरकारला देण्यात आला आहे.