अर्धातास पावसाने केले मीरा भाईंदरमधील नालेसफाईचे पितळ उघडे 

अर्धातास पावसाने केले मीरा भाईंदरमधील नालेसफाईचे पितळ उघडे 


 


भाईंदर:- मिरा-भाईंदर मधल्या मनपाची नालेसफाई किती फोल ठरली हे सोमवारी सायंकाळी पडलेल्या अर्धा तास मुसळधार पावसाने दाखवून दिले. मीरा भाईंदर शहरातील रस्त्यावर पाणी पाणी करून पालिकेचा १०० टक्के नालेसफाईचा भोंगळ कारभाराचे धिंडवडे निघालेले दिसले. भाईंदर मधील केबिन रोड ,फाटक परिसरात गुडघ्या इतके पाणी जमा झाल्याने नालेसफाई अर्धवट झाली असून त्यातील भ्रष्टाचार पावसाने समोर आणला आहे.दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील नालेसफाईचे खरे पितळ उघडे पडले आहे.


 


मीरा भाईंदर शहरात दरवर्षी पावसाळ्या पूर्वी नालेसफाई करण्यासाठी करोडो रुपये मनपाच्या तिजोरीतुन खर्च केले जातात. शहरातील नागरिकांनी जमा केलेला कररूपी पैसा नालेसफाईच्या नावावर हाजम केला जातो. पण शहरात मात्र पावसाळ्यात पुर परिस्थिती निर्माण होत असते . दरवर्षी नालेसफाई करण्यासाठी तेच अधिकारी, तेच इंजिनियर , तेच ठेकेदार, तेच उपठेकेदार, कामगार ही तिच आणि पाणी ही त्याच परिसरात भरते हे सगळे प्रत्येक वर्षी होण्यापाठीमागे कोण जवाबदार असा प्रश्न निर्माण झाला आहे. या वर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळें आणखी पावसाने सुरवात केली नाही तरीही ही अवस्था निर्माण झाली आहे तर यावर्षी मिरा-भाईंदर हे शहर जलमय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील लोकांना ,लहान मुलाना या पावसाने रस्त्यात भरलेले घाण पान्यातून, जावे लागते आहे. पहिलीच शहरात कोरोनाच्या साथीचा वाढता प्रभाव त्यामुळे अस्तव्यस्त झालेले जिवन, आणि याचकाळात गटारातील घाण कचरा हा रस्त्यावर जमा झाल्यामुळे या घाण पाण्यातुन लोकांना जावे लागते . पावसाच्या पाण्यामुळे रिक्शा, दुचाकी,चारचाकी वाहने चालवन्यास अडथळा निर्माण होत होता.


 


        मीरा भाईंदरमध्ये दरवर्षी शहरात नालेसफाईवर करोडो रुपये खर्च करून ही नालेसफाई अर्धवट राहते याला कोण जवाबदार दरवर्षी निर्माण होणारी परिस्थिती अधिकाऱ्यांना माहीत असूनही ती परिस्थिती बदलली पाहिजे या साठी अधिकारी काम करत नाहीत ठेकेदाराला पाठीशी घालून जनतेच्या करोडो रुपयांची वाट लागते त्याच त्याच ठिकाणी पावसाचे पाणी जमा होते. हे पाणी व्यवस्थित निचरा होऊन जावे यासाठी गाळ, माती , कचरा, हे नाल्यातून बाहेर काढले जाणे गरजेचे असते पण ठेकेदार आणि अधिकारी यांची साखळी असल्यामुळे हा गाळ काढल्या जात नाही. ठेकेदार अधिकाऱ्यांना हाताशी धरून आणि राजकीय नेत्यांच्या आशीर्वाद घेऊन काम करत असतो त्यामुळे ठेकेदारावर हवी तसी कडक कारवाई केली जात नाही. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करणे आवश्यक असते.यावर्षी नालेसफाईसाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर नालेसफाई पूर्ण करण्याची तारीख १० जून सांगितली आहे. यावर्षी मीरा भाईंदर मधील पालिकेने केलेल्या नाले सफाई वर शहरातील विविध भागातल्या नागरिकांनी वारंवार प्रश्न निर्माण केले होते त्याच्या बातम्या ही वृत्तपत्रानी प्रकाशित केल्या पण अधिकाऱ्यांनी मात्र या कडे दुर्लक्ष केले आहे. याच कारनामुळे सोमवार रात्रि पडलेल्या अर्धा तास पावसाने भाईंदर पूर्वेच्या रस्त्यावर पाणी पाणी झाले होते. भाईंदर पूर्व परिसरातील केबिन रोड,,फाटक गॅस, गोडावण गल्ली,मिरारोड च्या अनेक भागातील, परिसरातिल अनेक सोसायटी परिसरात रस्त्यावर पाणी भरले होते. इतकेच नाही तर भाईंदर स्टेशन बीपी रोड कडून केबिन रोड या परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे वाहतूक देखील ठप्प झाली होती.एकीकडे दरवर्षी पालिका तेच अधिकारी नाले सफाई १००% झाल्याचे दावे करत असतात आणि दरवर्षी शहरात पावसाचे पाणी विळखा घालते तसाच दावा या वर्षी देखील केला जाईल पण हा दावा सपशेल फेल ठरणार जसा दरवर्षी ठरतो तसा या वर्षीही ठरणार हे अर्धा तास पडलेल्या पावसाने एकाच दिवसात पालिकेचा दावा खोटा ठरवला अस म्हंटल तरी हरकत नाही कारण थोडाकाळ पडलेल्या पावसाने नालेसफाई चे खर रूप दाखवून दिल आहे. महापालिकेकडून योग्य उपाययोजना न करण्यात आल्याने या वर्षीदेखील शहर जलमय होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. 


 


मीरा भाईंदर शहरातील नाले सफाई १०० टक्के पूर्ण करण्यासाठी पालिका उपायुक्त डॉक्टर संभाजी पाणपट्टे यांच्या मार्गदर्शना खाली अधिकारी वर्ग काम करत असतो अनेक अधिकारी केबिन मध्ये बसूनच नालेसफाई ची फाईल बनवतात प्रत्यक्ष किती नालेसफाई झाली आहे. किती गाळ काढला, किती माती काढली, किती कचरा काढला कोणत्या वाहनाने उचलला कुठे नेवून टाकला मजूर किती काम करत होते त्यांची सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती का ठेकेदाराणे केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी अधिकारी साईटवर जाणे आवश्यक असतांना ही अधिकारी जात नाहीत त्यामुळे नालेसफाईचे तीनतेरा वाजत आले आहेत जे अधिकारी आपल्या कामात निष्काळजी पणा करतात त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे पण तसे होतांना दिसत नाही.


 


प्रितिक्रिया


 


पालिके मार्फ़त १०० टक्के नेस्ले सफाई झाल्याचे दावे करण्यात येत आहेत मात्र है दावे खोटे आहेत कारण सोमवारी पडलेल्या पावसाने सर्व परिसरात पाणी पाणी करून टाकले होते.


ऊमर मनिहार ( रहिवासी )


 


मनपा ने नालेसफाईच्या कामात दिरंगाई केली त्यामुळे अर्धा तास पाऊस पडला तरी जागोजागी पाणी साचते नालेसफाईच अर्धवट आहे मोठमोठे नाले साफसफाई झालेच नाहीत म्हणून भविष्यात याचा परिणाम जाणवेल यात तिळमात्र शंका नाही.


गौतम आसले (नागरिक)


 


नालेसफाईच्या कामात ठेकेदार आणि अधिकारी यांची मिलीजुली सरकार आहे. सफाईचा नावाखाली मोठा भ्रष्टाचार होत आहे . नालेसफाई करण्यात आली नाही त्यामुळे शहरातिल नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागनार आहे याला मनपा अधिकारी आणि ठेकेदार दोषी आहेत यांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जावी जेणेकरून जनतेच्या आरोग्यासी आणि हक्कासी असा निष्काळजी पणा करणार नाहीत.


रामभवन शर्मा (उप शहर प्रमुख शिवसेना)