मनाई आदेशाला धाब्यावर बसवून काशिमिरा,मिरारोड विभागात अनेक दुकाने सुरू

  • मनाई आदेशाला धाब्यावर बसवून काशिमिरा,मिरारोड विभागात अनेक दुकाने सुरू



 



  • काशिमीरा पोलिसांचे माहिती देऊनही दुर्लक्ष

  • मनपा अधिकारी हे चिरीमिरी घेऊन देतआहेत आशिर्वाद 

  • अतिक्रमण व फेरीवाले पथक मात्र शांत


 


जिल्हाधिकाऱ्यांचे मनाई आदेश असतांनाही त्याच बरोबर मनपा आयुक्तांनी काढलेल्या मनाई आदेशाला न जुमानता मिरा-भाईंदर मनपा प्रभाग समिती क्रमांक ६ मध्ये दूधडेरी,फळविक्री, मोबाईल रिपेरिंग विक्री,सह अनेक दुकाने जिल्हाधिकारी वआयुक्तांच्या मनाई आदेशाला धुडकवात वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायाचे दुकाने कुठे चोरीच्या मार्गाने तर काही ठिकाणी बिनधातपणे सुरू आहेत. पोलिस व मनपाअधिकारी मात्र यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत यामुळे या विभागात वेगवेगळ्या चर्चानां उधाण आले आहे.


 


मिरा-भाईंदर मनपा प्रभाग समिती क्रं. ६ मध्ये काशिमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत, पेनकरपाडा, पांडुरंग वाडी, गावठण,मिरागावं, मुन्शीकंपाउंड, काशीगावं, जनतानागर, मांडवी पाडा, धोंडूलापाडा, ग्रीनव्हिलेज, माशाचापाडा, मिनाक्षी नगर, डाचाकूल पाडा चेना, काजूपाडा या परिसरात काही दुकानदार मनपा अधिकारी आणि पोलिस कायद्याची भिती दाखवून तोडपाणी करत असल्यामुळे चोरीच्या मार्गाने तर काही दुकानदार बिनधास्त पणे मनाई आदेशाचे सर्रास 


पणे उल्लंघन करत असलेले दूधडेरी, भाजी वाले, फळवाले,मोबाईल ची दुकाने, टीव्ही, रेपरिंग, जनरल स्टोरर्स,किराणा दुकानेसह इतर दुकाने सुरू असलेली दिसून येत आहेत. याच विभागातून या शहराच्या महापौर आहेत. त्यांच्या विभागाची ही अवस्था असेल तर शहराची अवस्था काय असेल याचा अंदाज शहरातिल जनतेला येत असेलच हे सांगायला नको.


मिरारोड- मिरा-भाईंदर मनपा शहरात सरकारच्या नीतिनियमाचे पालन करणेकामी आदेश तर नेहमीच निघत आहेत. मात्र त्याचे पालन मात्र कितपत योग्यप्रकारे होत आहे की नाही हे पाहण्याकडे अधिकारी मात्र लक्ष देतांना दिसत नाही. त्याचा परिणाम शहरातील लॉकडाउन मध्ये कितीही वाढ केली तरीही कुठे चोरीच्या तर कुठे बिनधास्त पद्धतीने लॉकडाउन चे तीन तेरा करत व्यवसाय सुरू आहेत. यामुळे शहरात रुग्णांचा आकडा कमी होणार नाही असे शहरातील नागरिकांना वाटत आहे. 


 


मिरा-भाईंदर शहरात लॉकडाउन च्या आड सगळे व्यवसाय सुरू आहेत. या कडे मनपा अधिकाऱ्यांचे चिरीमिरी पोटी दुर्लक्ष होत आहे असे आरोप नागरिकां मधून लावले जात आहेत. त्यामुळे शहरात कागदावर लॉकडाउन जोरात सुरू आहे पण प्रत्यक्ष मात्र दुकानाचे अर्धे शेटर उघडे ठेवून सगळे व्यवसाय सुरू आहेत. नागरिक ही लॉकडाउन ला कंटाळले आहेत, घरातील आर्थिक परिस्थिती हालाखीची बनली आहे. कामाशिवाय जगणार कसे हा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे चोरीच्या पद्धतीने चाललेला व्यवसाय हा कोरोनाचा प्रसार वाढवण्यात कारणीभूत ठरत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरात आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे दहा दिवसाचा लॉकडाउन केला गेला मात्र रुग्ण संख्या तिळमात्र कमी झाली नाही. दहा तारखे पर्यंत असलेला लॉकडाउन वाढवून पुढील १८ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहील, असे परिपत्रक मनपा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वाढत्या लॉकडाऊनमुळे नागरिक चिंतेत आहेत मोल मजुरी करून गरिबाचा उदरनिर्वाह त्याच्या हातचे काम हिसकावून घेतले गेले आहे


 


१ जुलै ते ११ जुलै या कालावधीमध्ये लॉकडाऊन असताना मीरा भाईंदर शहरात या आकरा दिवसात कोरोनाचे २१२३ रुग्ण आढळून आले टाळेबंदी असताना धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. आणखी टाळेबंदी वाढवत १८ तारखे पर्यंत वाढ केली आहे पण शहरातले छुप्या पध्दतीने तर काही ठिकाणी उघडपणे व्यवसाय सुरूच आहेत. शहरातील आस्थापना वर बंदी.असतांनाही, दिवसभर दूधडेऱ्या, फळांची, मोबाईल दुकाने सह ईतर दुकाने सुरू आहेत. या कडे मनपा अधिकारी, अतिक्रमण, फेरीवाला विभागाचे अधिकारी आणि स्थानिक पोलिस प्रशासन कानाडोळा करत आहेत. मग रुग्ण वाढणार नाही तर काय होणार अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.