भाईंदर - कोरोना साथीचे वेगाने वाढत चाललेले संक्रमण आणि त्या संक्रमणात येत असलेला पोलिस कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात आढळत आहे. सर्वत्र लॉकडाऊन असून देखील लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दिवसरात्र आपले कर्तव्य पार पाडत आहेत. मीरा भाईंदर मधील काही पोलिस कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण देखील झाली होती.आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यापैकी कोणाला कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून ठाणे ग्रामीण पोलिस विभागाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.
देशात कोविड-१९ चे प्रमाण वाढत आहे जगात तिसऱ्या क्रमांकावर भारत पोहचला आहे. मिरा-भाईंदर चा रुग्ण मिळून येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याच बरोबर मीरा भाईंदरमध्ये अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील अनेक जण बरे झाले आहेत. पोलिसांना कोरोना संक्रमणाचा धोका टाळता यावा म्हणून अनेक प्रकारची दक्षता घेतली जात आहे ज्या मध्ये ठाणे ग्रामीण हद्दीतिल सर्व पोलिस स्टेशन वेळोवेळी सॅनिटायजर करण्यात येत आहेत. मीरा भाईंदर शहरात दिवसभर पोलिस नाकाबंदी दरम्यान उन्हा पावसात उभे राहून आपले कर्तव्य बजावत असताना पोलीसांचा अनेकांशी सबंध येत असतो त्यामुळे त्यांना फेसशिल्ट,मास्कचे वाटप केले असून त्याचा वापर करणे सक्तीचे केले आहे.पोलिसांची काळजी घेणे महत्वाचे असल्यामुळे पोलिस ठाण्या बाहेर निर्जंतुकीकरन यंत्र लावण्यात आले असून तसेच प्रत्येक पोलिस ठाण्यात गरम पाण्याची सोय करण्यात आली आहे पाणी गरम करण्याचे मशीन लावण्यात आले आहेत जेणे करून पोलिसांना उकळलेले शुद्ध गरम पाणी प्यायला मिळावे. पोलिस कर्मचाऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विटयामिन सी,विटयामिन डी, इमूलेशन पावर वाढवणाऱ्या काही गोळ्या,गरम पाण्याच्या बाटल्या, टिश्यू पेपर देखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दररोज कामावर येणाऱ्या कर्मचारी यांना ताप किवा श्वास घेण्यास कोणत्याही प्रकारचा त्रास नाही
हे तपासण्यासाठी टेम्परेचर मशीन,पल्स मशीन सर्व पोलिस ठाण्यात उपलब्ध करून दिल्या आहेत. तर काही ठिकाणी डॉक्टर दररोज येऊन कर्मचाऱ्याची आरोग्य तपासणी केली जात आहे.जर एखाद्या कर्मचाऱ्यास कोणत्याही प्रकारचा काही त्रास जानवू लागला तर त्याला लगेच उपचार घेण्यास सांगितले जात असून त्याची काळजी घेऊन तो लवकर ठीक व्हावा यासाठी विशेष प्रकारचे सकस आहारचे पॅकेट त्याला दिले जाते. त्यात चवनप्राश आदि ताकद वाढवणाऱ्या वस्तुंचा समावेश आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वय ५० वर्षा पेक्षा अधिक असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याना रस्त्यावर नाकाबंदीच्या जागी ड्यूटी दिली जात नाही. पोलीस कर्मचाऱ्यांनी सेवा बजावत असतांना सोशल डिस्टेन्स पाळून काम करावे जेणेकरून कोणताही संसर्ग होण्याची कमी शक्यता आहे अशा सूचना सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
प्रतिक्रिया :-
कोरोना साथीला रोखण्यासाठी पोलिस कर्मचारी आपली सेवा देत असतांना नागरिकांच्या संपर्कात यावे लागते त्याच बरोबर दिवसभर रस्त्यावर नाकाबंदी करत असतात त्यावेळी त्यांचा अनेकांशी सबंध येत असतो त्यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे यासाठी चांगल्या प्रकारे खबरदारी घेण्यास सांगितले असून या संकटमय काळात कर्मचाऱ्यांना अनेक आवश्यक सुविधा पुरवल्या जात आहेत. आरोग्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या वस्तु देखील सर्व पोलिस ठाण्यात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
शशिकांत भोसले ( उप विभागीय पोलिस अधिकारी ,भाईंदर )