मिराभाईंदर मधिल कोविड रुग्णांना माहिती मिळणार संकेतस्थळावर

मिराभाईंदर मधिल कोविड रुग्णांना माहिती मिळणार संकेतस्थळावर



 मिरारोड - मिरा भाईंदर मधिल कोविड 19 साथ पसरत असल्यामुळे महानगरपालिकेने शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये 80 टक्के बेड कोविड रुग्णांकरिता राखीव केले आहेत नागरिकांना मनपा व खाजगी हॉस्पिटलमधिल बेडची माहिती मिळावी म्हणून मनपाने संकेतस्थळ घोषित केले आहे या संकेतस्थळावर घरबसल्या महानगर पालिकेने कोविड घोषित केले आहे त्या हॉस्पिटलची सर्व माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.


 


कोविड 19 च्या साथीला घाबरून जाऊ नये नागरिकांना सुविधांचा अभाव निर्माण होऊ नये म्हणून सरकार योग्य ती पावले उचलत आहे. मिरा भाईंदर क्षेत्रात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी आणि रुग्णांवर उपचारासाठी शहरातील काही खाजगी हॉस्पिटल मनपाने कोविड साठी घोषित केले आहेत. शासनाने दिलेले निर्देश व सूचना नुसार महापालिका हद्दीतील खाजगी हॉस्पिटलमधिल ८० टक्के बेड हे कोविड-१९ रुग्णांसाठी आरक्षित ठेवले आहेत शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार इथे उपचार करणे आवश्यक आहे पण काही हॉस्पिटलमध्ये रुग्णांची लूट केली जात असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. यावर नियंत्रण ठेवत रूग्णांना हेलपाटे होऊ नये त्रास होऊ नये म्हणून शहरातील कोरोना बाधित रुग्ण व संशंयितांना


उपचार घेण्यासाठी कोणत्या खाजगी व मनपा रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत याबाबत


Online माहिती महानगरपालिकेने www.covidbedmbmc.in या


संकेतस्थळा उपलब्ध करून दिली आहे. 


त्यामुळे शहरातील रुग्णांना व नागरिकांना महापालिकेने नेमूण दिलेल्या हॉस्पिटलमध्ये व मनपा च्या सरकारी रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या


बेडस ची संख्या व त्यापैकी किती बेड रुग्णांनी व्यापलेल्या आहेत व किती


बेड रिकामे आहेत यापैकी आय.सी.यु मध्ये किती बेड रिकामे आहेत व 


आय.सी.यु. नसलेल्यामध्ये किती बेड रिकामें आहेत, याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे रुग्णांना व नागरिकांना या संकेतस्थळावर जाऊन खाजगी व मनपा रुग्णालयात बेड आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. रिक्त बेड , रुग्णवाहिका व शववाहिनी 022-28141516 या दूरध्वनीवरुनही बुक करण्याची सुविधा (24X7) महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे.


तरी शहरातील रुग्णांनी व नागरिकांनी या संकेतस्थळावर जाऊन या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना होणारा त्रास थोडा कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त आहे