लॉकडाउन च्या काळात पूर्व,पश्चिम भागात ये जा करण्यासाठी असलेला भूयारी मार्ग वाहतुकीस केला बंद
भाईंदर:- कोरोनाने मिरा-भाईंदर शहरात अक्षरशः थयथयाट सुरुकेला आहे. या छोट्याशा मनपा क्षेत्रात दररोज मोठया प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. हे पाहता मनपा आयुक्तांनी हे शहर पुन्हा दहा दिवस जनता लॉकडाऊन च्या माध्यमातून कडकडीत बंद करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मिरा भाईंदर शहरात 10 दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेताच शहरात सर्वत्र पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करत भाईंदर पूर्व आणि पश्चिमेला जोडलागेलेला भूयारी मार्ग देखील वाहतुकी करता बंद करण्यात आला आहे.
मिरा- भाईंदर मनपा हद्दीतील वाहतुकीसाठी असलेला एकमेव भूयारी मार्ग बंद करण्यात आल्यामुळे लोकांची ग़ैरसोय झाली आहे. पूर्व आणि पश्चिम भागाला हा मार्ग जोडला गेला आहे. गोल्डन नेस्ट चा उडानंपूल आणि रेल्वे स्थानक च्या बाजूचा असलेला हा भुयारी मार्ग हे दोन पर्याय रस्ते आहेत त्यातील हा भुयारी मार्ग बंद असल्यामुळे वाहतुक करणाऱ्यांना दूसरा मार्ग असलेल्या उड्डाणपूलाचा वापर करून हेलपाटे घेत जावे लागत आहे. बुधवार सकाळ पासूनच शहरातिल अनेक रस्ते पूर्वीच्या लॉकडाउन सारखे रस्ते बंद करण्यास सुरवात झाली असून काही मुख्य रस्ते वाहतुकी करता सुरु ठेवण्यात आले आहेत. ठिक ठिकाणी पोलिसानी नाकेबंदी लावली आहे. नियम तोडून प्रवास करताना आढळल्यास फाईन मारला जातो तर बऱ्याच वेळा गुन्हे दाखल केले जात आहेत. प्रत्येक वाहनांची वाहन थंबवून कसून चौकशी केली जात आहे. लॉकडाउनची अंमलबजावणी करताना काही नियम शिथिल करण्यात आले आसले तरही काही नियम कायम ठेवण्यात आले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य शासनाने अत्यावश्यक असल्यास बाहेर पडन्यास व दुचाकीवरून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. दुचाकीवरून प्रवास करण्यासाठी केवळ चालकाला परवानगी देण्यात आली आहे.मात्र तरी देखील मिरा भाईंदर शहरात मोठया प्रमाणावर दुचाकीस्वार डबलसीट अनावश्यक प्रवास करत आहेत . अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिस व काशिमिरा वाहतूक पोलिसांन कडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. शहरातील उत्तन ,गोल्डन नेस्ट,एस.के.स्टोन, काशिमीरा चौक,दहिसर चेक नाका , फाटक रोड,नवघर रोड या मुख्य ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत असून वाहन चालकांना थंबवून त्यांची विचारपुस करून जर अत्यावश्यक असेल तरच त्यांना पुढे जाऊ दिले जात आहे अन्यथा त्यांच्या वर वाहतूक पोलिस करोनाच्या अनुषंगाने राज्य शासनाने काढलेल्या आदेश भंग केल्याप्रकरणी मोटार वाहन अधिनियम १७९ नुसार वाहनधारकांवर कारवाई करत आहेत.मीरा भाईंदर मध्ये १० दिवस कडकडित बंद पाळून शहरातील वाढलेली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शहरातील नागरिक चांगले सहकार्य करत आहेत पण काही उपद्रवी नागरिक मात्र बिना कामाचे फिरतांना दिसत आहेत. या लॉकडाउन चा फायदा किती होईल हे मात्र सांगण्यासारखे सध्याचे चित्र स्पष्ट दिसत नाही.