गॅलेक्सी हॉस्पिटलची कोविड मान्यता रद्द गुन्हा दाखल करण्याची वाढते मागणी
मिरारोड - शहरात वाढता कोविड चा प्रभाव आणि मिळून येणारे रुग्ण पाहता उपचारासाठी खाजगी शहरातील काही हॉस्पिटल हे कोविड साठी ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती पण त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची आर्थिक लूट केली जात असल्याचे समोर आल्यामुळे त्या हॉस्पिटलची दिलेली मान्यता रद्द करण्यात आली आहे.
दिवसेंदिवस शहरात कोविड-19 चे रुग्ण वाढत आहेत यामुळे मिरा भाईंदर शहरातील सरकारने खासगी रुग्णालयांना देखील कोविड-19 च्या रुग्णालयाचा दर्जा देऊन सरकारने ठरवून दिलेल्या दरात उपचार करण्याची मुभा दिली. पण शहरात खाजगी रुग्णालयात रुग्णांची मनमाणीपणे लूट सुरू आहे या लुटी विरोधात सगळेच आवाज उठवत आहेत . अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शहरातले दोन्ही आमदार देखील होणाऱ्या अंधाधुंद कारभारा विरोधात बिनधास्त बोलत आहेत . याच पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर मनपा आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी मिरारोड परिसरातील गॅलेक्सी हॉस्पिटलची कोविड रुग्णालयाची मान्यता रद्द केली आहे.
मिरा भाईंदर शहरातील १३ खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णालये हे घोषित करण्यात आले आहेत. परंतु या सर्व रुग्णालयांनी आपली मनमानी करत आलेल्या रुग्णांची आर्थिक लूट सुरू केली आहे अवाच्यासव्वा बिल घेणे सुरू केले आहेत या संदर्भात अनेक नागरिक व लोकप्रतिनिधी यांनी तक्रारी केल्या आहेत. परंतु कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नव्हती. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते. पण नविन आलेल्या आयुक्तांनी या होणाऱ्या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे त्यानंतर मनपा आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी कोरोना दक्षता कमिटी स्थापन करून पाच ऑडिटर यांची नियुक्ती केली.
खाजगी रुग्णालयात ८० टक्के खाटा राखीव ठेवणे तसेच शासनाच्या सूचनेचे पालन होत आहे का हे पाहणे आवश्यक केले. मीरा भाईंदर मनपा आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी नोटीस बजावुन रुग्णालयास मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कामकाज न केल्याने खुलासा सादर करण्याचे सांगितले होते. यात ही महानगर पालिकेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आली आहे अनेक हॉस्पिटलनी खोटी माहिती दिली आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे. याबाबत गॅलेक्सी रुग्णालयाकडून कोणत्याही प्रकारचा खुलासा प्राप्त झाला नाही. रुग्णालयाकडून दिलेले अंतिम देयके आणि महानगरपालिकेस तपासणीसाठी पाठवलेले देयके, या रक्कमेत फरक दिसून आला. व हॉस्पिटलमध्ये जास्त बिल आकारणी केल्याचे चित्र स्पष्ट झाले त्यामुळे गॅलेक्सी या हॉस्पिटलची कोविड मान्यतादेण्यात आली होती ती रद्द केली आहे.पण शहरातील नागरिक या हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत आहेत.