सरकारी रुगणालायत मिळाला नाही उपचार , उपचाराअभावी गेला प्राण
रुग्णावर वेळेवर उपचार न झाल्याने रुग्णाचा मृत्यू
भाईंदर - भाईंदर मधील सरकारी रुग्णालयाची हलगर्जी आणि कर्मचाऱ्यांची मनमर्जी मुळें एका नागरिकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. भाईंदर पश्चिमेच्या शासकीय पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात रुग्णावर वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे
रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या रुग्णाला रुग्णालयात दाखल करून न घेता त्या रुग्णाला तब्बल १४ तास भर पावसात ठेऊन तमाशा बघणारे कर्मचारी यांच्यावर कारवाई ची मागणी जोर धरत आहेत.
मिरा-भाईंदर मधिल एकमेव सरकारी रुग्णालय असलेले भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी मानवतेला लाजवणारा प्रकार घडवून आणला आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णाला तब्बल १४ तास बाहेर बसवून उपचार न केल्यामुळे त्याला रुग्णालयाबाहेर बसून रहावे लागले. या वृद्ध व्यक्तीला वेळेवर उपचार मिळाले नाही. एवढे या रुग्णालयातिल कर्मचारी निर्ढावले कसे, त्यांच्यातिल मानवता नष्ट झाली आहे का? की या विभागाच्या प्रमुखांचे दुर्लक्ष होत आहे की, त्यांच्याच आशीर्वादात हे होत आहे. असे एक नव्हे तर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. १४ तास बाहेर ठेऊन ही या रुग्णांवर उपचार केले नाही अखेर त्या वृद्ध रुग्णाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवली येथे घेऊन जाण्यात सांगण्यात आले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( शताब्दी ) रुगणालायात नेताना अखेर त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कांदिवलीच्या रुग्णालयात पोहोचल्या नंतर डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले. हा दुर्दैवी प्रकार घडल्याने मनपा सत्ताधारी आणि आरोग्य अधिकारी यांच्या विरुद्ध नागरिकांत चीड निर्माण होत आहे.
मिरारोड पूर्वेच्या पेनकर पाडा परिसरात राहणारे हेमंत सावे (वय ५५ वर्षे) यांना ३ जुलै रोजी रात्री ताप आल्यामुळे व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने स्थानिक समाजसेवकांनी आरोग्य विभागाला कळवले. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास रुग्णवाहिकेतून त्यांना पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले नाही त्यामुळे त्यांना रुग्णालयाच्या बाहेर रात्रभर पावसात भिजत रहावे लागले. ४ जुलै सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्या रुग्णाच्या पत्नी रुग्णालयात भेटण्यासाठी गेल्या असता त्यांना धक्कादायक प्रकार समोर दिसला. रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या कठड्यावर त्यांचे पती बेशुद्धावस्थेत पडले होते. त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना माझ्या पतीला रुग्णालयात दाखल करा व उपचार करा अशी विनवणी केली परंतु त्यांना ऍडमिट केले नाही त्यामुळे त्यांनी त्यांनी पतीला रिक्षाने शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला जबाबदार कोण ?
या रुग्णावर वेळेत उपचार झाले असते तर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला नसता. त्या रुग्णाला शासकीय रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले परंतु उपचार का झाले नाही, चालकाने रुग्णालयात दाखल का केले नाही? रुग्णाला दाखल करून घेतले नाही तर त्याच्या नातेवाईकांना का कळवले नाही , या मृत्यूस जबाबदार कोण.?, असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत.
समाजसेवक सोमनाथ पवार यांनी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून संबंधित कर्मचारी व डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास रुग्णालय प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा तक्रारदार सोमनाथ पवार यांनी दिला आहे.
या सर्व घटनेची चौकशी करून जो कोणी या प्रकरणात जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असे रुग्णालयाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब आरसुळकर यांनी सांगितले. असे प्रकार जर सरकारी रुग्णालय करत असेल तर या शहराला या रुग्णालयाचा काय फायदा अशी भावना व्यक्त होत आहे.