सामाजिक कार्यकर्त्यांने केलेल्या याचिके विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी केले त्याच्या घरा समोर निदर्शने

सामाजिक कार्यकर्त्यांने केलेल्या याचिके विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी केले त्याच्या घरा समोर निदर्शने



मिरारोड येथील सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी राममंदिर स्थापना कार्यक्रमा संदर्भात हायकोर्टात दाखलकेलेल्या जनहित याचिके विरोधात भाजपा प्रवक्ते रणवीर वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली मिरा-भाईंदर भाजपा कार्यकर्त्यांनी याचिका कर्त्याच्या घरासमोर जाऊन आंदोलन केल्याने एकच खळबळ उडाली आणि काशिमिरा पोलिसांनी अखेर आंदोलन करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.


देशात कोरोना संक्रमणाचा वाढता प्रकोप पाहता या काळात असे कार्यक्रम आयोजित करू नये म्हणून कायदेशीर पद्धतीने आक्षेप घेत या कार्यक्रमाला थेट न्यायालयात आव्हान दिले. त्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आहेत. मिरा भाईंदर मधिल सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले हे काशिमिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत आहेत, त्यांनी ५ ऑगस्टरोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर स्थापनेचा कार्यक्रम पुढे ढकलावा अशी मागणी अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून केली होती. याचा राग आल्यामुळे भाजपा प्रवक्ता रणवीर वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील, अनिल ताटे सह काही भाजप कार्यकर्त्यांनी मात्र थेट याचिका कर्त्याच्या घराबाहेर निदर्शने केली आहेत त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराच्या स्थापनेचा कार्यक्रम होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ती याचिका उच्च न्यायालयाने गोखले यांची याचिका शुक्रवाररोजी उच्चन्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. पण आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी साकेत गोखले यांच्यावर हा समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर साकेत गोखले आर एस एस द्वारे हे आंदोलन केले जात असल्याचे ट्विट करत सांगितले आहे तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती त्यानुसार काशिमिरा पोलिस ठाण्यात निदर्शने करणाऱ्या चार कार्यकर्त्यांवर भारतीय दंड संहिता 143 ए, 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली व न्यालायत हजर करण्यात आले असता न्यालायने त्यांना जामीन मंजूर केला आहे.