काशिमीरा पोलिसांनी ४४८ किलो मावा केला जप्त
मिरारोड- सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत या काळात मोठया प्रमाणात गोडधोड पदार्थांची विक्री होत असते. असे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी लागणारा मावा गुजरात व राजस्थान राज्यातून मुबंईसह उपनगर ,ठाणे पालघर जिल्ह्यात आणला जातो. याच काळात नकली मावा मोठया प्रमाणात मुंबईत येत असतो त्यामुळे काशिमीरा पोलिसांनी हा आलेला मावा पकडून अन्न औषधी प्रशासनाच्या ताब्यात दिला आहे .
कोविड १९ च्या साथीचा काळ सुरू आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेला लॉकडाऊन थोडा शिथिल केला गेला आहे. सर्व प्रकारची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. सणासुदीचे दिवस सुरू झाली आहेत रक्षाबंधन, गणेशोत्सव जवळ आल्यामुळे मावा वापरण्यात येणाऱ्या अन्नपदार्थाची मागणी मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यासाठी अनेकदा नकली माव्याचा वापर अनेक दुकानदार करत असतात त्यामुळे मावा हा गुजरात , राजस्थान मधून मुंबई ठाण्यात आणला जातो. बनावट मावा हा मानवी आरोग्यास हानिकारक ठरतो. काशिमीरा विभागात असे प्रकार नेहमीच घडत असतात या पूर्वी ही नकली बटर बनवणारी कंपनी असो या भेसळ युक्त पदार्थ असो यावर छापा मारून कारवाई करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पोलिसांना मिळालेली गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना संशय आल्यामुळे काशिमीरा पोलिसांनी मावा घेऊन जात असलेली चारचाकी वाहन मुद्दे मालासह जप्त केले आहे.
मानवाच्या जीवनाशी खेळणारे प्रकार काही व्यक्ती जाणीवपूर्वक पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी गैरकृत्य करत असतात काशिमीरा येथे १ ऑगस्ट रोजी अन्नपदार्थात वापरण्यात येणारा मावा जालोर राजस्थान राज्यातून काशिमीरा विभागात चारचाकी वाहनाद्वारे येतअसल्याची माहिती काशीमीरा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार एम एच ०४, डी वाय ७८०८ या क्रमांकाच्या चारचाकी गाडीतून वाहतूक करताना पोलिसांनी काशीमीरा येथे गाडी थांबवून चौकशी केली असता त्या गाडीत मावा असल्याचे आढळून आले. पोलिसांना गाडी ताब्यात घेऊन सदरचा मावा जप्त करण्यात आला आहे. या गाडीत ४४८ किलो मावा असून ८७,०२४ रुपये इतक्या किमतीचा आहे. हा मावा मे. ब्रिजवासी मावावाला, मिरा रोड येथे असलेल्या पेढीसाठी घेऊन जात असल्याचे गाडी चालकाने सांगितले असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी उत्तरेश्वर एस. बडे यांनी दिली . सदरची कारवाई अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी उत्तरेश्वर एस. बडे यांनी सहा. आयुक्त डी. डब्लू भोगावडे व सह आयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या अन्नपदार्थाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला असून पुढील कारवाई विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर करण्यात येईल तसेच
सदरचा जप्त अन्नपदार्थाचा साठा संबंधित मे. ब्रिजवासी मावावाला यांच्या ताब्यात पुढील आदेशापर्यंत सुरक्षित ठेवलेला आहे अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी उत्तरेश्वर एस. बडे यांनी दिली आहे.