पाच महिन्यापासून रखडलेल्या पगाराबाबत परिवहन कर्मचाऱ्यांचे आयुक्त दालनासमोर ठिय्या आंदोलन
लॉकडाउन च्या काळापासून मिरा-भाईंदर मनपाच्या परिवहन सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन मागिल पाच महिन्यापासून देण्यात आले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची परस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. मागील पाच महिन्यांचा पगार मिळावा व मनमानी कारभार करणाऱ्या ठेकेदाराला काळ्यायादीत टाकण्यात यावे अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड१९ मुळे उभे टाकलेल्या संकटात ,कंपनी, कारखाने चालक आहेत, त्यांना विनंती केली होती की त्यांनी मजूर, कामगार यांना वाऱ्यावर न सोडता त्यांना या काळात पगार द्यावा आणि मानवतेचे दर्शन घडवून आणावे अशी विनंती केली होती. अनेकांनी तसी मदत ही केली पण मिरा-भाईंदर मनपा परिवहन सेवा चालवणारा ठेकेदार मात्र निगरगट्ट वृर्तीचा असल्यामुळे त्याचबरोबर अधिकाऱ्यांचे अप्रत्यक्ष पाठबळ आणि राजकीय आशीर्वाद असल्यामुळे परिवहन सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील पाच महिन्यापासून एक दमडीही दिली नाही त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेली मनपाची परिवहन सेवा ही ठेकेदाराला खाजगी तत्वावर चालवण्यास दिली आहे कडक असलेला लॉकडाऊन आता हळूहळू शिथिल केला जात असताना सर्वत्र महापालिकेची परिवहन सेवा सुरू होत आहे पण मीरा-भाईंदर महानगरपालिकेची परिवहन सेवा मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकत चालली आहे. प्रशासनाने संबंधित ठेकेदारांना १ कोटी १७ लाख रुपये देऊनी कर्मचाऱ्यांचा पगार न केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराच्या आणि प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले. आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन करून पगार देण्याची मागणी करण्यात आली पण गेंड्याची कातडी असलेल्या ठेकेदार मात्र प्रशासनाने पैसे दिल्यानंतरच पगार देण्यात येईल अशी भूमिका घेताना दिसून आला. महानगरपालिकेची परिवहन सेवेचा ठेका हा भागीरथी ट्रान्स कॉर्पोरेशन या कंपनीला उपलब्द्ध करून दिला आहे. १ ऑगस्ट २०१९ पासून या ठेक्याची सुरवात केली आहे या मध्ये ऐकून ७४ बस आहेत तर ५ बस ह्या वातानुकूलित आहेत
मीरा भाईंदर महानगरपालिका नागरिकांच्या सेवेकरिता लाखो रुपयांचा तोटा सहन करूनही शहरात परिवहन सेवा चालवत आहे. ठेकेदाराला प्रति किलोमीटर पाठीमागे ४२ रुपये दिले जातात, कोविडची साथ जशी पसरायला लागली आणि संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू झाला तेव्हापासून मीरा-भाईंदर ची परिवहन सेवा बंद ठेवण्यात आली होती तेव्हापासून महानगरपालिकेने सदर ठेकेदाराला त्या परिस्थितीमध्ये दोन कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली होती तरीही ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे पगार केलेले नाहीत त्यामुळे ठेकेदाराच्या या मनमानी कारभारामुळे कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे या ठेकेदाराला काळ्यायादीत टाकण्यात यावे अशीही मागणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केली आहे पण ठेकेदाराने प्रतिकिलोमीटर ला भाव वाढवून देण्यात यावा आणि अधिक पैसे मनपाकडून मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार केला जाईल अशी भूमिका घेतली आहे. बस मध्ये सध्याच्या परिस्थितीत मर्यादित सीट पेक्षा निम्मे प्रवासी वाहतूक करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे ते परवडनारे नाही त्यामुळे प्रतिकिलोमीटरचा दर वाढवून देणे आवश्यक आहे अशी मागणी केली आहे या बाबीकडे शासन किती गंभीरपणे विचार करेल हे पाहावे लागणार आहे.
मनपाची परिवहन सेवा चालू करण्या संदर्भात मनपामध्ये बैठक घेण्यात आली यात ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरु असलेला जो वाद आहे त्यावर योग्य तो निर्णय लवकरच घेतला जाईल.
मंगेश पंडित
सभापती परिवहन समिती
ठेकेदार पालिका प्रशासनावर दबाव बनवत असून पालिका प्रशासनाला वेठीस धरण्याचे काम करत आहे, त्यामुळे ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी आयुक्तांना करणार आहे.
आमदार गीता जैन