जाहीर सूचना
गोरेगाव पोलीस ठाणे मुंबई ,यांच्या वतीने जाहीर सूचना करण्यात येते की ,एक बेवारस इसम दिनांक 08/04/2020 रोजी आरे रोड, deluxe दुकानाच्या बाहेर, गोरेगाव पश्चिम, मुंबई एक बेवारस इसम आजारी असल्याचा संदेश प्राप्त झाला. सदर आजारी इसमांस हॉस्पिटल ला घेऊन जाण्याकामी महाराष्ट्र शासनाची रुग्णवाहिका 108 ला बोलावली असता त्यावरील डॉक्टरांनी आजारी इसमास तपासून 14.40 वाजता दरम्यान मयत घोषित केले .मयत इसमाच्या नातेवाईकांचा अद्याप पर्यंत शोध लागलेला नाही. सदर मयत इसमाचे कोणी नातेवाईक अथवा मित्रपरिवार असेल तर त्यांनी वरील पोलिस ठाण्यात त्वरित संपर्क साधावा .
बेवारस मयत व्यक्तीची सविस्तर खालील प्रमाणे माहिती
गोरेगाव पोलीस ठाणे ,अपमृत्यू नोंद क्रमांक 25/ 2020 कलम 174 फौदंप्र दि.08/04/2020
मयताचे वर्णन - नाव - अर्जुन बब्बर, वय अंदाजे 65 वर्ष, डोक्यावरील केस मध्यम वाढलेले काळे-पांढरे, दाढी वाढलेली, रंग सावळा ,बांधा सडपातळ, पोट आत गेलेले,
पोलीस तपास अधिकारी -पोउनी लोंढे, गोरेगाव पोलीस ठाणे मुंबई