नाकाबंदीच्या तपासणी दरम्यान पोलिसांनी पकडला २६ हजाराचा गुटखा 

नाकाबंदीच्या तपासणी दरम्यान पोलिसांनी पकडला २६ हजाराचा गुटखा


मिरारोड - महाराष्ट्रात तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी असताना ही चोरीच्या मार्गाने राज्यात मोठया प्रमाणात तंबाखू मिश्रित बनलेला गुटखा व इतर पदार्थ विकले जातात यात मिरा- भाईंदर शहर कसे सुटणार ? हे ही खरे आहे. भाईंदर शहरातील उत्तण येथे चोरीच्या मार्गाने घेऊन जात असलेला गुटखा उत्तन सागरी पोलिसांनी रविवारी दुपारी नाकाबंदी दरम्यान एका चारचाकी वाहनातून घेऊन जात असताना मिळून आल्यामुळे तात्काळ कारवाई करत पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे.


 


 प्रतिबंदीत असलेल्या गुटख्याची तस्करी राज्यात ग्रामिण ते शहरी भागात मोठया प्रमाणात केली जाते. पोलिसांचे छापे वारंवार पडतात पण बंदी असलेली गुटख्याची तस्करी मात्र थांबत नाही. मुंबई उपनगराला लागुणच असलेल्या मिरा- भाईंदर मनपा हद्दीत भाईंदर पश्चिमच्या उत्तण विभागात प्रतिबंधित असलेला गुटखा विक्रीसाठी जात होता त्यावेळी भाईंदर पश्चिमेला असलेल्या उत्तन सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरी चेक पोस्ट येथे रविवारी दुपारी नाकाबंदी सुरू होती त्या दरम्यान एका चारचाकी वाहन क्र. एम एच ०४ एजी ५४३६ या वाहनाची तपासणी केली असता पोलिसांना त्या वाहनात प्लास्टिकच्या दोन गोण्या आढळून आल्या पोलिसांना संशय आल्यामुळे गोणीत काय आहे याची पाहणी केली असता त्यामध्ये ८ रुपये किंमतीची तंबाखूची ८० पाकिटे तसेच १८ हजार ३७५ रुपये किंमतीचा दोन गोणीत सुगंधित सुपारी गुटखा मिळाला आहे . 


असा एकूण २६ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे . हा गुटखा कोठून आणला गेला, कुठे घेऊन जाणार होते या बाबत अधिक माहिती मिळू शकली नाही या प्रकरणी कार चालकासह दोन जणांवर उत्तन सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी या प्रकरणी चारचाकी वाहनासह गुटखा व तंबाखू जप्त केला असून या प्रकरणी अधिक तपास उत्तण पोलिस करत आहेत.