अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डॉक्टरवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डॉक्टरवर गुन्हा दाखल


 


डॉक्टरांना लोक देवाच्या रूपात पाहत असतात पण जेव्हा एखादी डॉक्टर पेशेच्या आड लपलेली विकृतमनोवृत्ती बाहेर पडते तेव्हा मात्र सर्वसामान्य माणसाच्या मनात चीड निर्माण होते त्या पेशेकडे बघण्याचा सर्वसामाण्यांचा दृष्टिकोन बदलतो. अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात घडली आहे ही धक्कादायक घटना मनात डॉक्टरि पेशेला कलंकित करणारी आहे. क्लिनिकमध्ये गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवून डॉक्टरने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी संशयित आरोपी डॉक्टरविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून या घटनेचा पोलिस तपास करत आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन १४ वर्षीय मुलगी आणि तिची आई आजारी होती. ३० जुलै रोजी मुलगी आणि आई गुलजार नगरमधील एका क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेली होती. दोघींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना औषधं दिले. त्यानंतर दोघींना दुसऱ्या दिवशी क्लिनिकमध्ये येण्यास सांगितलं. मात्र, दुसऱ्या दिवशी आईला अन्य कामात व्यस्त असल्यामुळे मुलीच्या आईने मुलीसोबत १० वर्षीय मुलाला क्लिनिकमध्ये पाठवलं. आणि दोघेजण डॉक्टर कडे गेले दुपारी साधारण १२ ते १ वाजताच्या दरम्यान ते मुलगी आणि १० वर्षांचा मुलगा क्लिनिकमध्येच बसून राहिले. बराच वेळ बसून राहिले, मात्र डॉक्टरने त्यांची वैद्यकीय तपासणी केली नाही. क्लिनिकमधून सर्व रुग्ण गेल्यानंतर डॉक्टरने तिला आतमध्ये बोलावले. डॉक्टरने त्याच्यासोबत असलेल्या कम्पाउंडरला अन्य कामानिमित्त क्लिनिकबाहेर पाठवले. तर मुलीसोबत आलेल्या मुलाला पैसे सुटे आणण्यासाठी पाठवले. त्यानंतर क्लिनिकमध्ये एकट्या असलेल्या मुलीवर बलात्कार केला. घरी परत गेल्यावर मुलीने घडलेला प्रकार तिच्या मावशीला सांगितले. मावशीने तिच्या आईला घरी बोलावून घेतले आणि मुलीसोबत वाईट घडले आहे मुलीने सांगितलेली हकीगत आईला सांगितली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने शांतीनगर पोलीस ठाणे गाठले आणि संबंधित डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नोंद करून घेत, या घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेत सत्यकाय आहे लवकरच बाहेर येईल.