गेल्या पाच महिन्यापासून थांबलेली एसटी सेवा होणार सुरू
महाराष्ट्र राज्यात कोविड साथीमुळे गेल्या पाच महिन्यापासून थांबलेली लालपरी आता धावणार आहे वंचित ने संपूर्ण महाराष्ट्रात यासाठी मोठे आंदोलन केले त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे सरकारने एसटी सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे असे परिवहन मंत्री यांनी सांगितले.
कोरोनाच्या संसर्गजन्य साथीच्या महामारी मुळे संपूर्ण देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन गेल्या ५ महिन्यांपासून सुरू असलेली एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा २० ऑगस्टपासून म्हणजे आजपासून सुरू होणार आहे.
परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला आहे. वंचित चे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात एसटी सुरू करण्यासाठी राज्यभर मोठे डफली बाजाव आंदोलन केले होते. आणि आंदोलनाला जनतेने मोठा प्रतिसाद दिला होता, तसंच सरकारने तातडीने आंतरजिल्हा एसटी वाहतूक सुरू करण्याची मागणी वंचित द्वारा केली होती. त्या आंदोलनामुळे सरकारला धारेवर धरले आणि परिणामी राज्यात एसटी सेवा सुरू करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत
एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा सुरू होणार आहेत. या बसेसच्या तिकीट दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या बसेस टप्प्याटप्प्याने सुरु होत असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेसाठी आरक्षणाची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे. एसटीच्या प्रवासासाठी ई -पासची आवश्यकता आता लागणार नाहीय. पण प्रवासात प्रवाशांनी कोविड – १९ च्या साथी संदर्भात घालून दिलेले सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. एसटी सेवा बंद असल्याने महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसानही झाले होते.