प्रविण तरडे यांचा खोडसाळपणा की अज्ञान ? फेसबुकवर व्हिडीओ शेअर करून मागितली माफ़ी

प्रविण तरडे यांचा खोडसाळपणा की अज्ञान ? फेसबुकवर व्हिडीओ शेअर करून मागितली माफ़ी


प्रविण तरडे स्वतःच्या मूर्खपणामुळे शोशल मीडियावर झाला ट्रोल


 


एका अभिनेता आणि दिग्दर्शक यांनी बेजबाबदार पणाचे वर्तन करत चक्क गणेशमूर्तीच्या पाठखाली भारताची राज्यघटना ठेवल्याने त्याला शोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले गेले त्याने हा मूर्खपणा खोडसाळ वृत्तीने केला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शोशल मीडियातून केली जात आहे. ट्रोल झालेले पाहून त्या नंतर त्याने फेसबुकवर एक एक व्हिडिओ शेअर करून सर्वांची माफी मागितली आहे.


 


अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी त्यांच्या घरी गणपती प्रतिष्ठापना केली आहे. या वर्षीच्या गणपती उत्सव साजरा करताना त्याने घरच्या गणपतीसाठी त्यांनी पुस्तक गणपती अशी संकल्पना मांडत सजावट केली. गणेश मूर्तीच्या बाजूला चारही बाजूने त्यांनी पुस्तके सजविली आहेत. यात गणेशाची मूर्ती ही पाटावर ठेवली आणि पाटाखाली देशाची राज्यघटना अर्थात संविधानाचे पुस्तक ठेवले. याचे फोटो जेव्हा शोशल मीडियावर व्हायरल झाले तेंव्हा तरडे आला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले.


सुज्ञ, जाणकार अभिनेता ,दिग्दर्शक असतांनाही देशाचे संविधान हे पाटाखाली ठेवण्याचा खोडसाळपणा का केला? असा प्रश्न विचारला जात आहे, प्रविण तरडे यांनी हा मुद्दामहून खोडसाळपणा केला, मूर्खपणा जाणीव पूर्वक करत आहेत असा आरोप करत समाज माध्यमातून चांगलेच ट्रोल झाले तर सोशल मीडियातुन तरडे यांच्यावर कारवाईची मागणी केली.


समाज माध्यमातून ट्रोल झाल्यानंतर ,चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली असता प्रवीण तरडे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करुन सगळ्यांची जाहीर माफी मागितली. माझ्या हातून मोठी चुक झाली आहे हे मान्य केले, माझ्या हे अनेक संघटनानी माझ्या लक्षात आणून दिले. माझ्याकडून लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याने मी जाहीर माफी मागतो आणि माझी चूक मान्य करतो, असे त्यांनी म्हटले आहे.


समाज माध्यमातून टिकेची झोड उठल्यानंतर अखेर प्रवीण तरडे यांनी ते छायाचित्र हटवले. मात्र, जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे असे आरोप समाजमाध्यमातून प्रविण तरडे यांच्यावर करण्यात आले आहेत,