राज्यात पुन्हा पावसाने दमदार सुरवात केली

राज्यात पुन्हा पावसाने दमदार सुरवात केली


 


जून, जुलै महिन्यात पडणाऱ्या पावसाने विश्रांती घेत ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला जोरदार सुरवात केली. दोन महिने थांबलेल्या पावसाने दमदार हजेरी लावत मुबंई, उपनगरे व आसपास चा परिसर जलमय केला तेंव्हा पासून सुरू झालेला पाऊस थोड्या मंद गतीने पडतोच आहे. आज राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह पश्चिम उपनगर आणि ठाण्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भालाही हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. 


 


सकाळपासूनच राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईतल्या अनेक उपनगरांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.


मुंबई, पश्चिम उपनगर आणि ठाण्यात जोरदार पावसाला सुरुवात ; आज राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा


देण्यात आलेला आहे. राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह पश्चिम उपनगर आणि ठाण्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस पडला की शेतकरी राजा सुखावतो पण तो अतिवृष्टीत पडला तर शेतकऱ्यांना व इतर उधोगधंद्यांना देखील फटका बसतो. राज्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे भीतीही तेवढीच निर्माण झाली आहे.