भाईंदर पश्चिम पोलिस ठाणे पीएसआय मनिषा पाटील यांच्यामुळे विवादाच्या भोवऱ्यात
अधिकारी एक महिला असून ही पीडित महिलेला न्याय देण्याऐवजी करतेय अन्याय
भाईंदर- भाईंदर पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे अशा अनेक तक्रारी वरिष्ठांकडे जात असतांनाच नुकतंच एका बलात्काराला बळी पडलेल्या तरुणीची तक्रार दाखल करून न घेता अधिकाराचा गैरवापर करत उलट तिला दमदाटी करून तिच्यावर दबाव टाकून तिला हाकलून दिले गेले. त्यामुळे न्याय न मिळण्याच्या निराशेपोटी विष घेऊन आत्महत्या करण्याचं पाऊल तिला उचलावे लागले या प्रकरणामुळें भाईंदर पोलिस ठाणे पुन्हा एकदा विवादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.
भाईंदर पश्चिम मधिल जयअंबे नगर मध्ये राहणारी एक १९ वर्षीय तरुणी ही एका योगेश चौरशिया वय ३० वर्षं या लग्न झालेल्या युवकाच्या प्रेमजाळ्यात फसली. युवकाने त्या तरुणीला लग्नाची फूस लावून पळवून घेऊन गेला पंचवीस तारखेला मुलगी बेपत्ता झाली म्हणून मुलीचे पालक इतरत्र शोध घेत होते पण सापडली नाही शेवटी मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्या युवकाने त्या तरुणीसोबत लग्न न करता लग्नाचे आमिष देत तिची अब्रू लुटली आणि भाईंदर ला घेऊन आला. मुलगी घरी गेली तिला आपली फसवणूक झाली आहे हे तिच्या लक्षात आले तेव्हा झालेला प्रकार घरच्यांना सांगितला तेंव्हा घरचेही घाबरून गेले आणि भाईंदर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर मात्र चक्क पिडीतेची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी तिला दमदाटी करत, धमकावत व पीडितेच्या आईला ही उर्मट भाषेत अपमान करत हिला गावी घेऊन जा आणि लग्न करून टाक इथे राहू नका असा अजब प्रकारचा सल्ला देत पीडितेला हाकलून देण्यात आले. सतत अपमान सहनकरत हेलपाटे मारूनही गुन्हा दाखल केला जात नाही. पोलिसांकडून हा प्रकार घडल्यामुळे आपल्याला न्याय मिळनार नाही एक तर इज्जत लुटली गेली आणि पोलिसांकडून अशी वर्तणूक मिळाल्यामुळे निराश होऊन या तरुणीने ३० जुलै रोजी मध्यरात्री फिनाईल हे विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घरच्यांनी तात्काळ मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यामुळे तिचे प्राण वाचले. या तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांनी आपली बाजू सेफ ठेवण्यासाठी सहकार्य न करणारे पोलिस तात्काळ दवाखान्यात पोहचले व तरुणीचा जवाब नोंदवून घेतला आणि ३१ जुलै २०२० रोजी भारतीय दंड संहिता १८६० कलम ३७६,५०६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडितेवर होणाऱ्या अन्यायाची चर्चा जोरदार पणे शहरात सुरू झाली. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटकही केली आहे. पोलिस प्रशासनाकडून मिळालेली वागवून ही अतिशय अवहेलना करणारी आहे. तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. त्यामुळे भाईंदर पश्चिम चे पोलिस ठाणे पुन्हा विवादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. पिडीत तरुणीने जेव्हा टोकाचे पाऊल उचलले तेव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यापूर्वी तिच्यावर पोलिस हे दबाव टाकत होते असे आरोप नातेवाईक व मुलीला मदत करणाऱ्यांनी केला आहे. तरुणीच्या आईने आमदार गीता जैन यांच्याकडे न्यायासाठी गुहार लावली आहे.आणि गीता जैन या सुद्धा या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरसावल्या आहेत अशी माहिती मिळत आहे.
पिडीत महिलेला पोलिसांवरचा विश्वास उडालेला दिसून येत आहे. ज्या महिला पोलिस अधिकारी मनिषा पाटील आहेत त्यांनीच या पूर्वी पीडितेला अपमानस्पद वागणूक देत प्रताडीत केले आहे. पिडितेने गुन्हा दाखल करू नये म्हणून पिडितेवर दबाव आणून आपल्या अधिकाराचा गैरवापर करत होत्या त्याच जर माझा जबाब घेत असतील तर त्या जबाब मी सांगितले ते कसे घेणार असा प्रश्न पीडितेने उपस्थित केला आहे. माझ्या म्हणण्यानुसार जबाब घेतला गेला नाही पीएसआय मनिषा पाटील यांनी आपल्या मनमर्जी प्रमाणे जबाब लिहिला आहे असे देखिल पीडितेचे म्हणणे आहे त्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळण्याची दाट शक्यता आहे. पोलिस आपला बचाव करण्यासाठी पीडितेवर दबाव आणू पाहत आहेत असेही पीडितेच्या भावना व्यक्त होताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिस अधिकारी हे कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत अशी चर्चा शहरभर सुरू आहे. पोलिस प्रशासनावर असलेला जनतेचा विश्वास उडत चालला आहे. काही अधिकाऱ्यांमुळे पोलिस प्रशासन बदनाम होऊन वादाच्या भोवऱ्यात येत आहे असे अनेकांना वाटत आहे. पोलिस विभागाला बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्यावर वरिष्ठ लक्ष कधी केंद्रित करणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.