काशिमीरा पोलिसांनी छापा टाकून नशेच्या पदार्थांचा साठा केला जप्त

काशिमीरा पोलिसांनी छापा टाकून नशेच्या पदार्थांचा साठा केला जप्त



काशिमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तरुनपिढी ही नशेच्या आहारी जात आहे. तरुणांमध्ये नशा करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. औषध म्हणून वापरण्यात येणाऱ्या द्रव्याचा नशा करण्यासाठी वापर केला जात आहे. या नशेच्या पदार्थांची चोरीच्या मार्गाने विक्री करण्यात येत होती. या औषधाचा अवैध साठा जमा करून त्याची विक्री केली जात होती याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार काशिमीरा पोलिसांनी छापा मारून वेगवेगळ्या प्रकारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


काशिमीरा विभागात जास्त प्रमाणात झोपडपट्टी, चाळीच्या वसाहती आहेत. लॉकडाउन च्या काळात तर गांजा, दारू, गुठखा यांची विक्री करणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले होते . या परिसरात चाळ माफिया, भु माफिया, ड्रग्स माफिया, लॉजिंग, बार माफियांनी आपले बस्तान मांडले आहे. त्याचे परिणाम तरुण पिढी व परिसरातील जनतेवर होत आहेत. या परिसरातली तरुणपिढी नशेच्या आहारी जातांना दिसत आहे. डॉक्टर च्या चिट्टी शिवाय जे औषध मेडिकल मधून मिळत नाही. ते औषध चोरीच्या मार्गाने विक्री केले जात होते, ज्या औषधा चा वापर नशा करण्यासाठी केला जात आहे. याची माहिती काशीमीरा पोलिसांना मिळाली त्यानुसार काशिमीरा पोलिसांनी कारवाई करत अवैध होत असलेल्या विक्रीच्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीची द्रव्य हे नशेच्या वापरासाठी केले जात असलेले मिळून आले. या मध्ये क्लोरफेनिरामाइन (chrolphenriamine maleate) कोडिन फॉस्फेटयुक्त कफ सिरप कंपनीच्या मॅक्सकफ (maxcoff) नावाच्या औषधांनी भरलेल्या बाटल्यांचे १२ बॉक्स ज्याची किंमत१,६९,९२० आहे तर cough Linctus नावाच्या औषधाचा १ बॉक्स मिळून आला त्याची किंमत १४००० हजार आहे व Nitravet -१० नावाच्या गोळ्यांच्या औषधांचे ५५ बॉक्स मिळून आले आहेत त्यांची किंमत ४६२० एवढी आहे. असा ऐकून मुद्देमाल १ लाख ८८ हजार ५४० रुपयेचा साठा जप्त करण्यात आला. मिळून आलेला साठा हा कोणतीही विक्रीची परवानगी नसतांना हा साठा जमा केला होता तो अवैध पद्धतीने विक्री करून लोकांच्या सार्वजनिक आरोग्यास हानी पोहचवण्यासाठी याचा वापर केला जात होता, मिळून आलेल्या साठ्यात जे औषध झोप, गुंगी येण्यासाठी वापरले जानारे आहे असे सांगण्यात येते. घोडबंदर रोड लगत आर टी ओ जवळ असलेली सिपटींग येथे मनपाने दिलेल्या बैठया चाळीत दिनांक ११ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली असून यात दोन महिला आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गु.र.न. II ६४८/२०२० कलम १८(क) १८(अ) २७(बी) २८(ए) औषधीद्रव्य, सोंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० प्रमाणे नोंद केली आहे या प्रकरणाचा अधिक तपास काशिमीरा पोलिस करत आहेत.