मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक ६ च्या कार्यालयात मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी जाऊन गोंधळ करत राडा घातला, मोबाईलफोन द्वारे फेसबुक या समाजमध्यातून लाईव्ह येत प्रभाग कार्यालयात दारूची पार्टी सुरू आहे असे आरोप केले त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत प्रभाग अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. कार्यलयात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यापैकी प्रभाग अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांना निशाणा बनवत प्रभाग अधिकाऱ्यास मारहाण केली आहे.
मिरारोड पूर्व मधिल रामनगर येथे असलेल्या प्रभाग समिती कार्यालय क्रं.६ मध्ये, १६ ऑगस्ट रोजी रविवारी पावने ४ वाजताच्या दरम्यान काही मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते गेले असता त्यातील एका कार्यकर्त्याने फेसबुक वर लाईव्ह व्हिडीओ चालवला की त्यात मीरारोडच्या राम नगर येथील प्रभाग कार्यालयात दारूची पार्टी सुरु असल्याचा आरोप केला गेला, आम्ही कार्यालयात आल्यामुळे दारूची बाटली व इतर ,ग्लास खाली फेकून देण्यात आले असे व्हिडिओत आरोप करण्यात आले . त्याच बरोबर त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना दमदाटी करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली गेली प्रभाग अधिकारी याना तुमचा चेहरा लोकांना दाखवा म्हणत त्यांच्या तोंडावर लावलेला मास्क खेचण्यात आला त्यावेळी प्रभाग अधिकारी यांनी विरोध केला असता काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली, उपस्थित असलेल्या काही जणांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. फेसबुक या समाजमध्यातून केलेल्या लाईव्ह मुळे शहरात चर्चेला उधाण आले, घडलेल्या प्रकारामुळे शहरात मनपा कर्मचाऱ्यात एकच खळबळ उडाली तर कर्मचाऱ्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या शहरात कारवाई करतांना प्रभाग अधिकाऱ्यांवर अनेक वेळा हल्ले झालेले आहेत पण या प्रकाराची घटना शहरात पहिल्यांदाच घडली आहे. त्यामुळे राजकीय पदाधिकाऱ्यांची मुजोरी व दादागिरी वाढल्याचे मत अनेक जाणकार व्यक्त करत आहेत.ही घटना घडली त्यावेळी कार्यलयात प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे , नरेंद्र चव्हाण, निवृत्त अधिकारी दादासाहेब खेत्रे हे उपस्थित होते त्यांनी मनसेच्या आलेल्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की, आम्ही दारू पिलेली नाही तसा काही प्रकार नाही, कोणतीही पार्टी केली नाही वाटल्यास आमची वैद्यकीय चाचणी करा असे मनसैनिकांना विनंती केली पण कार्यकर्ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते त्यांनी आयुक्तांना फोन लावला व नंतर पोलिसांना पाचारण केले. कार्यालयात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते की, शीतल नगर येथील गटारात पडून मरण पावलेल्या तरुणा प्रकरणी प्रभाग अधिकाऱ्यांचा काहीही संबंध नसतानाही अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात येत असल्याने आयुक्तांना निवेदन दयायचे होते ते बनवण्यासाठी आम्ही एकत्र येऊन निवेदन बनवत होतो असे सांगितले पण कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती अधिकाऱ्यावर आरोप करत सांगितले तुम्ही आम्ही आल्यामुळे बाटली , ग्लास खाली फेकले आहे ते आम्ही बघितले आहे असे म्हणत ग्लास व काचेची फुटलेली बॉटल अधिकाऱ्यांनाआणून दाखवली. काशिमीरा पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहचले परस्थितीची पाहणी करूनतिथे असलेल्या सर्वाना पोलिस ठाण्यात घेऊन गेले . पालिका अधिकाऱ्यांना वैद्यकीय तपासणी साठी पालिका रुग्णालयात पाठवण्यात आले .काशिमीरा पोलीस सूत्रांकडून अशी माहिती मिळते आहे की, कार्यालयात दारू पीत होते या तसा कोणताही पुरावा पोलिसांना आढळून आला नाही तर अधिकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. प्रभाग अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांच्या भ्रमणध्वनी वर फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी फोन न उचलल्यामुळे कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही अद्याप तरी याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही अशी माहिती मिळते आहे.