केंद्रसरकार, राज्यसरकार कोरोना बाधित रुग्णांपाठी दीड लाख रुपये देते ही माहिती खोटी - शिरशेटवार

केंद्रसरकार, राज्यसरकार कोरोना बाधित रुग्णांपाठी दीड लाख रुपये देते ही माहिती खोटी - शिरशेटवार


 


देशातील या राज्यातील कोणत्याही महानगर पालिका,नगरपालिका,नगरपरिद या अन्य स्वायत्त संस्थाना केंद्र किंवा राज्य सरकार अशी रुग्णांच्या पाठीमागे कोणतीही मदत करत नाही एका रुग्णाच्या मागे दीड लाख रुपये मिळतात हे साफ खोटे असून अशी चुकीची माहिती कुणीही प्रसार माध्यमाद्वारे पसरून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे अशी माहिती नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी न पा सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.


 


.


 


 


 


सगळीकडे कोरोनाचे थैमान सुरू आहे कोरोनाने सर्व नागरिक वेठीस धरले आहे. परस्थिती जरी संकटमय असली तरीही त्याचा मुकाबला करण्यासाठी सरकार आपल्या परीने प्रयत्न करत आहे. पण नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अफवा पसरवून चुकीची माहिती पसरवली जात आहे. ती खोटी माहिती आहे     


कोविड -19 या महामारी चा प्रतिकार करण्यासाठी, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा आळा घालण्यासाठी नगरपालिकेला केंद्रशासन किंवा महाराष्ट्र शासनाकडून एकही रुपया मिळाला नाही नगरपालिका आज जो काही खर्च करीत आहे तो सगळा खर्च 14 व्या वित्त आयोगतुन करित आहे.


याउलट येथील उपजिल्हा रुग्णालयाला या काळात नगरपालिकेच्या वतीने 20 पी पी ई किट, 3 बॉक्स हॅन्डक्लोज 3 फवारणी स्प्रे पंप, 5 लिटर चे 5 कॅन बॉटल व एक सैनी टायझर स्टँड देण्यात आल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.


शहरात एखादा भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर तो भाग बांबू उभारून प्रतिबंधित क्षेत्र केला जातो असे करताच काही विघ्नसंतोषी लोक आता एका पेशंटच्या मागे दीड लाख रुपये भेटतात त्यामध्ये 50 हजार रुपये न.पा.ला, 50 हजार रुपये पोलीस विभागाला व 50 हजार रुपये तहसील विभागाला मिळतात अशी अफवा मोठ्या प्रमाणात पसरून जनतेमध्ये गैरसमज पसरवित आहेत. हे साफ खोटे आहे यावर कुणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन नगराध्यक्षांनी केले.


 चुकीची माहिती कुणीही प्रसार माध्यमाद्वारे पसरून नागरिकांची दिशाभूल करीत असेल तर त्याच्याविरुद्ध व तो मेसेज फारवर्ड करणार्‍याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी सांगितले.


यावेळी आजी माजी नगरसेवक आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक मारुतीराव गायकवाड, मार्तंड वनंजे आदी उपस्थित होते.