शिवसेनेचे कर्नाटक भाजपा सरकार विरोधात केला रास्ता रोको मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा केला प्रयत्न


 


मिरारोड - कर्नाटक राज्यातील मराठी भाषिक असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात ग्रामपंचायत च्या परवानगीने ५ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, तेथील काही स्थानिक नागरिकांचा विरोध असल्यामुळे कर्नाटक प्रशासनाने शुक्रवारी रात्री रातोरात हा अश्वारूढ पुतळा हटवला गेला याघटनेनंतर कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांमध्ये याचे पडसाद उमटले तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे.


मीरा भाईंदरमध्येही शिवसेनेकडून निषेध..नोंदवला गेला. काशिमीरा नाका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी रस्ता रोको व कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला गेला व येडीयुरप्पा यांचा फोटो असलेल्या पोस्टर ला चपला हाणून निषेध नोंदवला.तेथील भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.सरकाच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. रास्तारोको आंदोलन केल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शिवसेनेचे मिरा-भाईंदर शहर अध्यक्ष प्रभाकर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.-मीरा भाईंदर शिवसेनेनच्यावतीने काशीमीरा जवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.कर्नाटक मधिल भाजपा सरकारने जाणीवपूर्वक सूडबुद्धीने महाराजांचा पुतळा हटवला आहे. लवकरात-लवकर पुतळा ज्या ठिकाणी होता तिथे बसवण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांनी दिली. यावेळी महिला जिल्हाप्रमुख स्नेहल सावंत, नगरसेविका तारा घरत, स्नेहा पांडे, प्रवक्ते शैलेश पांडे तसेच आराध्य सामंत, सलमान हाशमी, पप्पू भिसे, धनेश पाटील मुख्तार सुंबड , नरेंद्र उपरकर, राजू पाटील इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते. 


 


 कर्नाटक चे भाजपा सरकार नरमले 


 


छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्याचे पडसाद कर्नाटक राज्यासह महाराष्ट्रात ही मोठया प्रमाणात उमटले या घटनेने संतप्त शिवप्रेमींनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात आंदोलनं केली. शेवटी सरकारने नमते घेत आवश्यक त्या परवानग्या घेऊन आठ दिवसात पुन्हा त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे.