मीरारोड पूर्व येथील नयानगर पोलिस ठाण्याच्या हद्दी मधील नया नगर परिसरातील गुलशन इमारतीच्या बंद असलेल्या दुकानाबाहेर बेरोजगारीला कंटाळून तीस वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तात्काळ दखल घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
मुंबई उपनगराला लागूनच असलेल्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये मिरा रोड च्या नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तीस वर्षीय युवकाने आर्थिक चंचनीला ला कंटाळून गळफास लावून घेतल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे . सरकारचे नियोजन आणि धोरणांचा परिणाम देशातल्या सर्वसामान्य लोकांवर पडत असल्यामुळे देशात उत्पन्न झालेली बेरोजगारी, कोविड साथीमुळे करण्यात आलेला लॉकडाउन यामुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. संसाराचा गाडा कसा चालवावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांच्या हाताचे काम गेले, नोकरी गेली, आता करायचे काय ? काम मिळेनासे झाले आहे. याचे परिणाम सर्वसामान्य जनतेत उमटत आहेत. बेरोजगारीला कंटाळून मीरारोडच्या नया नगर भागातील गंगा कॉम्प्लेक्स मध्ये राहणारा तीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे हा युवक पाच महिन्यापूर्वी दुबई वरून आला होता. युवकाचे नाव सलमान सय्यद असे समजते आहे .
सलमान गेल्या काही दिवसांपासून कामाच्या शोधात होता. काम मिळत नसल्याने बेरोजगारीमुळे तो त्रस्थ होऊन नैराश्यात गेला होता. आर्थिक स्थिती खराब बनली होती पर्याय समोर दिसत नव्हते त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे याच नैराश्य पोटी त्याने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास आपल्या घरापासून शंभर मीटरच्या परिसरात गुलशन इमारतीच्या येथे बंद असलेल्या दुकानाबाहेर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब सकाळी नागरिकांच्या लक्षात येताच स्थानिकांनी नया नगर पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ पावले उचलत पोलिस घटनास्थळी पोहचले त्यांनी पंचनामा करून युवकाचे मृत शरीर ताब्यात घेऊन, शवविच्छेदनासाठी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
पोलिसांना पंचनाम्या दरम्यान युवकाच्या खिश्यात एका व्हिसीटींग कार्ड वर आई ,बाबा ,बहीण मला माफ करा,' आय एम अपसेट 'असे लिहिले असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा अधिक तपास नया नगर पोलिस ठाण्याचे पोलिस करत आहेत.